Breaking News
Loading...
Home / बातम्या / ठाकरे कुटुंबाच्या नवीन ८ मजली “मातोश्री” बंगल्याचे काम पूर्ण, काय आहेत वैशिष्ट्ये ?

ठाकरे कुटुंबाच्या नवीन ८ मजली “मातोश्री” बंगल्याचे काम पूर्ण, काय आहेत वैशिष्ट्ये ?

मातोश्री म्हणले की महाराष्ट्रातल्या असंख्य मराठीजणांच्या डोळ्यासमोर जी अनेक चित्रे उभी राहतात, त्यात ठाकरे कुटुंबाच्या मातोश्री बंगल्याचे एक चित्र नक्कीच असते. शिवसेनेच्या स्थापनेपासून आजतागायत या बंगल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडी पहिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ७० च्या दशकात बांधलेल्या या मातोश्री बंगल्यातुनच आयुष्यभर शिवसेना वाढवली.

कित्येक सर्वसामान्य लोक आमदार, खासदार होतानाच्या घटनांचा, राजकीय खलबतांचा हा मातोश्री बंगला साक्षीदार आहे. पण आता उद्धव ठाकरेंचा नवीन मातोश्री बंगला बांधून तयार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. पाहूया त्या नवीन बंगल्याविषयी…

Loading...

ठाकरे कुटुंबाचा नवीन मातोश्री बंगला कुठे आहे ?

बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक मातोश्री बंगल्यातच अशी लाखो शिवसैनिकांनी मागणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ऑक्टोबर २०१६ मध्ये वांद्रे पूर्वच्या कलानगर भागात नवीन मातोश्री बंगल्यासाठी प्लॅटिनम इन्फ्रास्ट्रक्चरकडून ११.६० कोटी रुपयांना एक प्लॉट खरेदी केला होता.

१० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावरती नवीन मातोश्री बंगल्याचे काम करण्यात आले आहे. नुकतेच त्या बंगल्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर उद्धव ठाकरे वर्ष बंगल्यात राहायला जातात की नवीन मातोश्री बंगल्यात राहायला जातात ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

काय आहेत नवीन मातोश्री बंगल्याची वैशिष्ट्ये ?

ठाकरे कुटुंबाचा ‘मातोश्री १” बंगला ३ मजल्यांच्या होता, परंतु नवीन “मातोश्री २” बंगला ८ मजल्यांच्या आहे. या नवीन मातोश्री बंगल्यात ३ ड्युप्लेक्स फ्लॅट्स आहेत. त्यासोबतच ५ बेडरुम्स, स्टडीरुम, होम थिएटर, स्वीमिंग पुल, अत्याधुनिक जीम आणि भव्य असा हॉल आहे.

या बंगल्याला बीकेसीच्या बाजूने एक आणि कलानगरच्या बाजूने एक असे दोन्ही दिशेला दरवाजे आहेत. तसेच पुस्तकांची आणि फोटोंची लायब्ररी आहे. कार पार्किंगसाठी सुसज्ज अशी सोय आहे. राजकीय खलबतांसाठी गुप्त खोलीही असणार आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या भोजनासाठी मोठे स्वयंपाकघर आहे. त्यासोबतच खास सुरक्षाव्यवस्थाही आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *