Breaking News
Loading...
Home / बातम्या / टाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास

टाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास

अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा पायउतार होणार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आता मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा संपली आहे. बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.

बसवराज बोम्मई हे लिंगायत समाजाचे आहेत. येडियुरप्पा जेव्हा दिल्लीत राजीनाम्याच्या घडामोडींसंदर्भात गेले तेव्हाच दिल्लीतील बड्या नेत्यांनी बसवराज बोम्मई यांचे नाव सुचविले होते. मंत्रिमंडळात देखील बोम्मईंना दुसरे स्थान होते. २००८ साली बसवराज बोम्मई यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. १३ वर्षांतील राजकीय प्रगतीवर थेट बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली आहे.

Loading...

बसवराज बोम्मई यांचा जन्म २८ जानेवारी १९६० मध्ये झाला. बोम्मई हे भारतीय जनता पक्षाआधी जनता दलाचे नेते होते. त्याचे वडील एसआर बोम्मई हे देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. जनता दलातून बसवराज यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली होती. लिंगायत समाजाचे नेतृत्व करत वडिलांप्रमाणेच राजकीय दबदबा बनवण्यात बसवराज यांना काही काळातच यश आले.

ते अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांचे खास होते. बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पा यांच्या सांगण्यावरूनच भारतीय जनता पक्षात २००८ साली प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. येडियुरप्पांच्या काळात दोन नंबरचे वजनदार मंत्रीपद त्यांनी सांभाळले होते.

बसवराज बोम्मई हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहातून केली होती. दोन वेळा विधानपरिषदेवर त्यांची निवड झाली होती. तीन वेळेस ते जनतेमधून आमदार मधून निवडून गेले आहेत.

Loading...

भारतीय जनता पक्षात जाण्याआधी त्यांनी एचडी देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडेंसोबत काम केले होते. १९९८ आणि २००४ साली ते धारवाडमधून विधानपरिषदेचे आमदार होते. जनता दल युनायटेडला नंतर रामराम ठोकून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि आता ते थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *