Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / नीरज चोप्रावर भारत सरकारने केला एवढा खर्च की; त्या खर्चाचे सुवर्णपदकाने केले चीज

नीरज चोप्रावर भारत सरकारने केला एवढा खर्च की; त्या खर्चाचे सुवर्णपदकाने केले चीज

भारताने ऑलिम्पिक खेळात मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचे दिसून आले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्ध्येत भारताने सहा पदकांची कमाई केली आहे. नीरज चोप्रा या खेळाडूने तर भालाफेक या खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. नीरज चोप्राचा हा सुवर्णपदकाचा विजय फार मोठा आनंद भारतीयांना देऊन गेला.

नीरज चोप्राचा हा विजय ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदकांची कमाई केली आहे. भारत सरकारने पण नीरज चोप्राच्या प्रशिक्षणावर पैसे मोठ्या प्रमाणावर खर्च केले आहेत. परदेशी प्रशिक्षक आणि ट्रेनिंगवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे.

Loading...

नीरज चोप्रासाठी भारत सरकारने परदेशी प्रशिक्षक नेमले होते. त्याला सर्व सोयी सुविधा सरकारच्या वतीने पुरवण्यात आल्या होत्या. दक्षिण आफ्रिका, पोलंड, तुर्की, फिनलंड येथील स्पर्धा आणि प्रशिक्षण मध्ये सहभाग नोंदवला होता. या सर्व स्पर्धांसाठी त्याला सरकारकडून मोठा प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

नीरज चोप्राच्या प्रशिक्षण, स्पर्धा आणि ट्रेनिंगच्या काळातील खर्च सरकारनेच केला होता. त्यावर ६,११,९९,५१८ रुपये करण्यात आला आहे. हा खर्च २०१६ ते २०१९ या कालखंडात करण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिक पर्यंत तब्बल २६ स्पर्धांमध्ये त्याला ही मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नीरज चोप्राच्या ऑप्रेशनसाठीचा खर्च पण सरकारने केला आहे. नीरज चोप्रा त्या कालावधीत आराम करत होता. जानेवारी २०२० मध्ये ८७. ८६ मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिक साठी स्थान पक्के केले आहे. नीरज चोप्राचे पदक मिळवल्यापासून बरेच जण कौतुक करत आहेत पण त्यामागे किती कष्ट आहेत हे कोणालाच माहित नाही.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *