Breaking News
Home / बातम्या / एकनाथ खडसेंना मंत्री बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा या २ पैकी एक मंत्री देऊ शकतो राजीनामा!

एकनाथ खडसेंना मंत्री बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा या २ पैकी एक मंत्री देऊ शकतो राजीनामा!

भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी एकनाथ खडसे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधतील, खडसेंच्या भाजपा सोडण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असं खडसे म्हणाले आहेत.

एकाही राजकीय पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यांनी माझ्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी केलेली नव्हती, विधानमंडळात कोणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल तर मी एका मिनिटात राजकारण सोडायला तयार आहे. राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला असं विधान खडसेंनी भाजपा सोडताना केलं होतं.

दरम्यान भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी २३ तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करतील.

खडसे यांना राष्ट्रवादीने कुठलेच आश्वासन दिले नाही असे म्हंटले आहे. पण खडसे यांची राजकारणात असलेली पकड बघून त्यांना राष्ट्रवादी मंत्रिपद देऊ शकते. त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाआधीच त्यांना कृषिमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीकडून खडसे यांना मंत्रीपद द्यायचं झाल्यास २ पैकी १ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. राजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते.

करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप लागले. त्यामुळे ते वादात सापडले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल असं बोललं जात आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *