आरोग्यबातम्या

माहितीदायक! चिकन खाण्याचे ‘हे’ आहेत मोठे फायदे

कोणताही नवीन रोग आला की लोक चिकन खाल्यामुळे पसरतो वगैरे अफवा पसरवतात आणि काही दिवसांसाठी पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठे नुकसान होते असा प्रकार अनेक वर्षांपासून आपल्या देशात सुरु आहे. मात्र चिकनमधून आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अत्यल्प प्रमाणात मेद शरीराला मिळते.

१०० ग्रॅम भाजलेल्या चिकनमधून आपल्याला २६ ग्रॅमच्या आसपास प्रोटीन मिळते. शरीरयष्टी सुधारण्यासाठी आणि पिळदार शरीरासाठी चिकन खाणे नक्कीच फायदेशीर आहे. कमी प्रमाणात मांस असलेल्या चिकनमधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि मेद मिळते. शरीर बळकट होण्यास चिकन खाल्याने मदत होते.

प्रोटीन प्रमाणेच चिकनमधून आपल्याला फॉस्फरस, कॅल्शियम यासारखी आवश्यक मिनरल्सचा पुरवठा होतो आणि आपले हाडं बळकट होण्यास मदत होते. चिकनमध्ये असणाऱ्या सेलेनियम घटक सांधेदुखीची समस्या कमी करते. चिकनमध्ये व्हिटॅमिन बी ५ आणि ट्रापटोफन हे दोन घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभरातील तणाव व थकवा कमी होण्यास मदत होते.

चिकनमधून मिळणाऱ्या मॅग्नेशियम घटक पी एम एसमुळे पाळी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत होते, तसेच या दिवसात होणारे मूड स्विंग्स टाळण्यासाठी मदत होते. चिकनमधून मिळणारे झिंक घटक पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉनची पातळी वाढविण्यास मदत करते सोबतच शुक्रांणूची संख्या देखील वाढविण्यास मदत करते.

एका वैज्ञानिक संशोधनातून पुढे असलेली बाब म्हणजे चिकन सूप न्युट्रोफिल्स या इमू सेल्सचे स्थलांतर रोखते. यामुळे संसर्गजन्य आजारापासून आपला बचाव होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

चिकनमध्ये व्हिटॅमिन बी ६ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करण्यास मदत होते. या व्हिटॅमिनमुळे होमो सिस्टाईनची पातळी कमी करण्यास मदत होते परिणामी हृदयविकाराचे प्रमाणही मंदावते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार रेडमीट खाण्याऐवजी चिकन खाणे हा एक हेल्दी उपाय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button