मागील दहा वर्षात जपानमध्ये मुस्लिमांची संख्या दुपटीने वाढली आहे. या लोकसंख्येतील लक्षणीय वाढीला कारण आहे धर्मांतर. जपानमध्ये २०१० मध्ये मुस्लिमांची संख्या जवळपास १ लाख दहा हजार च्या आसपास होती. तर आता हीच लोकसंख्या २ लाख ३० हजार पर्यंत पोहचली आहे.
विशेष म्हणजे वाढलेल्या लोकसंख्येत ५० हजार जपानी लोक हे धर्मांतर करून मुस्लिम बनले आहेत. ही माहिती जपानच्या वसेडा युनिर्व्हसिटीचे प्राध्यपक तनाडा हिरोफुमी यांनी जाहीर केली आहे.
याउलट जपानच्या लोकसंख्येत मात्र घट होत आहे. तर जपानचा जन्मदर देखील कमी झाला आहे. यामुळे येथे युवकांची कमी देखील भविष्यात भासू शकते.
जपानमध्ये २००१ मध्ये केवळ २३ मशिदी होत्या. ज्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जपानमध्ये ११० नव्या मशिदी बांधण्यात आल्या आहेत.
जपानमध्ये मशिदींची संख्या वाढली असली तरी अजूनही मुस्लिमांना काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. जपानमध्ये कब्रस्तानमध्ये वाढ करण्याची मागणी मुस्लिमांनी लावून धरली आहे. कब्रस्तानमुळे जमीन अशुद्ध होईल आणि जमिनीखालील पाण्याच्या साठ्यांना याचं नुकसान होईल असं तेथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.