Breaking News
Loading...
Home / बातम्या / मुंबईच्या पहिल्या दंगलीला कारणीभूत ठरली रस्त्यावरची भटकी कुत्री

मुंबईच्या पहिल्या दंगलीला कारणीभूत ठरली रस्त्यावरची भटकी कुत्री

प्राण्यांचा संबंध धर्माशी जोडून त्यांच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे अनेक प्रसंग आपल्याकडे घडले आहेत. त्यापैकी १८५७ चा उठाव हे प्रसिद्ध उदाहरण आहे. त्यावेळी ब्रिटिशांनी इनफिल्ड नावाच्या बंदुका वापरायला सुरुवात केली होती. त्या बंदुकांमध्ये जी काडतुसे वापरली जात, ती गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवली जायची.

ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी ओठात धरून उघडावी लागत. पण हिंदूंमध्ये गाय पवित्र आणि मुस्लिमांमध्ये डुक्कर निषिद्ध मानले जात असल्याने त्यांना ही काडतुसे म्हणजे आपल्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार वाटला आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.

Loading...

असाच एक प्रकार कुत्र्यांच्या बाबतीतही झाला होता. मुंबईच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक दंगली झाल्या, परंतु मुंबईच्या पहिल्या दंगलीला चक्क भटकी कुत्री कारणीभूत ठरली होती. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया…

तत्कालीन मुंबई सरकारच्या दफ्तरात अधिकृतपणे १८३२ साली घडवून आणल्या गेलेल्या मुंबईच्या पहिल्या दंगलीची नोंद “1832 Bombay Dog Riots” अशी ठेवण्यात आली आहे. झालं काय की त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत आपले चांगलेच बस्तान बसवले होते. त्याचबरोबर मुंबईच्या रस्त्यांवरही भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली होती. १८३१-३२ च्या सुमारास एका ब्रिटिश सरकारे कर्मचाऱ्याला मुंबईच्या रस्त्यावरील एक भटका कुत्रा चावला. उपचाराअभावी रेबीजमुळे त्याचा मृत्यू झाला.

मरण्यापूर्वी त्या ब्रिटिश कर्मचाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीकडे मोठी रक्कम दिली आणि त्यातून मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ब्रिटिश प्रशासनाने मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आपल्या शिपायांना अशी बेवारस कुत्री ठार मारण्याचा हुकूम दिला. ठार मारलेल्या कुत्र्याची शेपटी घेऊन येणाऱ्यांना बक्षीस म्हणून ८ आणे देण्याची घोषणा करण्यात आली. पुढे पुढे हे शिपाई कुत्री ठार न मारता केवळ त्यांच्या शेपट्या आणून बक्षीस मिळवायला लागली.

बक्षिसाच्या हव्यासापोटी अनेक शिपायांनी पारशांच्या घरची पाळीव कुत्रीही पकडून नेली. ब्रिटिशांच्या या कुत्रेमार मोहिमेमुळे पारशी समाजात संतापाची लाट उसळली. पारशी धर्मात कुत्रा हा प्राणी पवित्र मानला जातो. ७ जून १८३२ रोजी मुंबईच्या फोर्ट परिसरात ब्रिटिश शिपाई भटकी कुत्री शोधून कारवाई करत असताना पारशी समाजातील तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला.

त्यांनी ब्रिटिश सैनिकांच्या अन्नधान्याच्या गाड्या अडवून त्यातले पाव, मांस असे अन्न फेकून दिले. ब्रिटिश अंमलदारांवर माती, कचरा, मेलेल्या घुशी अशी घाण फेकली. बाजार बंद पाडले. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी ब्रिटिश प्रशासनाने वेळप्रसंगी गो ळ्या घालण्याचे आदेश दिले. धरपकड सुरु झाली. अनेकांना २-३ वर्षे कारावासाच्या शिक्षा झाल्या.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *