बातम्या

मुंबई विमानतळाच्या नावावरून शिवसेना आक्रमक; छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्वरित न दिल्यास संघर्ष वाढणार

महाराष्ट्रात सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सरकार आणि स्थानिकांमध्ये मोठा संघर्ष दिसून आहेत. संघर्षनेते दि. बा. पाटील यांचेच नाव या विमानतळाला देण्यात यावे यासाठी सध्या जोरदार आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकारने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.

हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी तोडफोड केली आहे. या विमानतळाचे संचालन नुकतेच उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योगसमूहाकडे देण्यात आले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’च्या बोर्डची तोफोड केली आहे आणि लावलेला सदरील बोर्ड उखडून फेकून दिला आहे.

शिवसेनेने आरोप केला आहे की, हे विमानतळ सर्वप्रथम ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नावाने ओळखले जात होते. मात्र काही दिवसांपासून अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र महाराष्ट्रात असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जिथे आहे तिथे जर असे करण्यात आले तर हे अजिबात सहन केले जाणार नाही असा संतप्त इशारा दिला आहे.

हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव विमानतळाला दिलेले असताना अदानी एअरपोर्ट असे नाव देण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून भारतीय कामगार सेनेने हा फलक उखडून फेकून दिला आहे. यासंदर्भात भारतीय कामगार सेनेचे सचिव संजीव कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यावेळी मुंबई विमानतळाचे टेकओव्हर पूर्ण झाले होते तेव्हा गौतम अदानी यांनी ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापन केल्याचा आम्हाला आंनद आहे. मात्र नंतर लगेचच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे नाव काढून टाकले आणि त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

शिवसेनेने म्हटले आहे की, जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या येथे होत्या. मात्र त्यांनी कधीही असे केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे काम करत आहेत का ? अदानींनी काय संपूर्ण विमानतळ विकत घेतले आहे का ? असा संतप्त सवाल देखील मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button