Breaking News
Loading...
Home / बातम्या / देशात कोरोनाचा धोका वाढत असताना बॉलीवूडने केले हे घृणास्पद कृत्य!

देशात कोरोनाचा धोका वाढत असताना बॉलीवूडने केले हे घृणास्पद कृत्य!

राज्यासह देशभरात करोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. आपण कोरोनासाठी चांगली काळजी घेतोय.

पण याच संवेदनशील गोष्टीच्या बाबतीत बॉलीवूडमध्ये मात्र घृणास्पद कृत्य घडलं आहे. देशात कोणतीही एखादी मोठी घटना घडली कि बॉलीवूडमध्ये त्या घटनेवर सिनेमा तयार करण्यासाठी स्पर्धाच सुरु होते. मागील वर्षी घडलेल्या पुलवामा हल्ल्यानंतर देखील असंच काहीस घडलं होतं. या हल्ल्याच्या निगडित सिनेमांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. असंच काहीसं कोरोनाच्या बाबतीत झालं आहे.

Loading...

‘कोरोना प्यार है’ हे नाव काल सोशल मीडियावर तुमच्या ऐकण्यात आलं असेल. कोरोना आजारावर सिनेमा बनवण्यासाठी लोकांनी टाईटल रजिस्टर करायला सुरुवात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार IFTPC म्हणजेच इंडियन फिल्म एंड टेलीविजन प्रोड्यूसर काउंसिलने सांगितले आहे कि ‘कोरोना प्यार है’या नावाने एक टायटल रजिस्टर करण्यात आलं आहे.

‘इरोज़ इंटरनेशनल’ या मोठ्या कंपनीने हे टायटल रजिस्टर केले असून या सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिलं जात असल्याचं इरोज कडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय अजून एक टायटल समोर आलं आहे. ‘डेडली कोरोना’. या विषयावर देखील सिनेमा बनणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोनामुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. तसेच अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूडच्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी कधी कधी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात टायटल रजिस्टर करण्यात आले बघूया..

कलम ३७० हटल्यानंतर-

कलम ३७० हटल्यानंतर बॉलीवूडमध्ये या नावाशी निगडित नावाने सिनेमे रजिस्टर करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या विषयाशी निगडित २०-३० सिनेमे त्यावेळी रजिस्टर करण्यात आले होते. यामध्ये ’आर्टीकल 370′, ‘धारा 370’, ‘धारा 35A’, ‘कश्मीर हमारा है’ या टायटलचा समावेश होता.

मुंबई दहशतवादी हल्ला-

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यावर सिनेमा बनवण्यासाठी देखील असेच काहीसे घडले होते. यावर आधारित २० पेक्षा अधिक सिनेमे रजिस्टर करण्यात आले होते. ‘ताज टेरर’, ‘ऑपरेशन फाइव स्टार मुंबई’, ’26/11- मुंबई अंडर टेरर’ आणि ‘शूटआउट एट ऑबरॉय’ हे टायटल यामध्ये होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *