Breaking News
Home / बातम्या / पीएम केअर फंडात मोदींनी स्वतःच्या खिशातून दिली इतकी देणगी

पीएम केअर फंडात मोदींनी स्वतःच्या खिशातून दिली इतकी देणगी

२८ मार्च २०२० रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर म्हणजेच प्रधानमंत्री केअर फंड हा पब्लिक चॅरिटेबल फंड स्थापन केला. या पीएम केअरचा उद्देश कोरोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीशी लढण्यासाठी अर्थ उभारणी हा आहे. लॉकडाऊन काळात कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते जनतेपर्यंत अनेकांनी संस्थांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या या फंदात आपली देणगी जमा केली. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील स्वतःच्या खिशातून या फंदात देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

तसे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक कार्यासाठी आतापर्यंत अनेकदा देणगी दिली आहे. मुलींच्या शिक्षणापासून गंगा नदी स्वच्छता अभियानासाठी मोदींनी आपल्या बचतीतील पैसे दान दिल्याचे अनेक प्रसंग आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उभा करण्यात आलेल्या पीएम केअर फंडामध्ये स्वतःजवळचे २.२५ लाख रुपये दान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच स्वतःला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन त्यातून आलेले १०३ कोटी रुपयेही मोदींनी दान केले आहेत.

केवळ पीएम केअर फंडच नाही, तर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती, आरोग्य सेवा किंवा इतर गरजेच्या वेळीही मोदींनी आपला दानशूरपणा दाखवला आहे. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक बचतीमधून २१ लाख रुपये कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी दिले होते.

२०१९ मध्येच मोदींना दक्षिण कोरियात मिळालेल्या सिओल शांतता पुरस्काराची १.३० कोटी रुपये रक्कम त्यांनी नमामि गंगे प्रोजेक्टसाठी दान केली होती. २०१५ साली त्यांना मिळालेल्या भेटवस्तुंच्या लिलावातून जमा झालेले ८.३५ कोटी रुपये देखील त्यांनी नमामि गंगे प्रकल्पासाठी दान दिले होते.

२०१४ साली गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या बचतीतून २१ लाख रुपये मदत केली होती. नुकतेच त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची लिलावातून आलेले ३.४ कोटी रूपयेही त्यांनी दान केले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *