Breaking News
Loading...
Home / आरोग्य / स्वयंपाक बनवताना केल्या जाणाऱ्या या चुका टाळल्या तर जेवण होईल स्वादिष्ट

स्वयंपाक बनवताना केल्या जाणाऱ्या या चुका टाळल्या तर जेवण होईल स्वादिष्ट

स्वयंपाक बनवणे ही एक कला आहे. घरातील लेकी सुनांना आपल्या माहेराकडूनच किंवा सासरी आल्यानंतर ही कला अवगत होत असते. सुरुवातीलाच ही कला योग्यरीत्या शिकवणे किंवा अवगत होणे हे देखील तितकेच गरजेचे असते, कारण या कलेत थोडेसे जरी कमी जास्त झाले तरी बनवलेल्या स्वयंपाकाची चव बिघडायला वेळ लागत नाही.

असे बेचव जेवण देखील अनेकदा कुटुंबातील कलहाचे कारण बनलेले बघायला मिळते. हे होऊ नये यासाठी स्वयंपाकादरम्यान घडणाऱ्या काही चुका टाळल्या तर आपल्या हातचा स्वयंपाक उत्तम होईलच, शिवाय तो स्वादिष्टही कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Loading...

स्वयंपाकादरम्यान टाळा या १३ चुका

१) बटाट्याचा फ्राय करण्यापूर्वी ते उकडून घ्या आणि नंतर फ्राय करा. यामुळे बटाटा आतून आणि बाहेरुन देखील चांगला शिजविला जाईल. २) मटण किंवा मासे बनवत असताना भांडे आधी थोडेसे गरम करा, यामुळे नॉनव्हेज आणि मासे चांगल्या रीतीने शिजवले जातील. ३) फोडणी देताना लसूण सर्वात शेवटी टाका, कारण लसूण जर सुरुवातीला टाकला तर तो लवकर जळून जाईल आणि त्यामुळे जेवणाची सगळी चव बिघडून किंवा बदलून जाईल.

४) लोणी आणि क्रीम आधी वितळवून घ्या. नंतर ते थंड करुन कुस्करलेल्या बटाट्यात घाला. यामुळे लोणी आणि क्रीम बटाट्यात चांगल्या पद्धतीने मिसळली जाईल. ५) हिरव्या भाज्या धुवून व्यवस्थितरीत्या सुकल्यानंतरच शिजवाव्यात, कारण भाज्यांमध्ये पाणी राहिल्याने भाजी जास्त शिजते आणि पातळ होते. ६) मासे ओलसर कढईमध्ये शिजायला टाकू नका, कारण त्याची वाफ झाल्याने मासे व्यवस्थितरीत्या शिजत नाहीत आणि शेवटी ते करपून जातात.

७) अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये नॉनव्हेज जेवण बनवल्यास त्याला विचित्र असा वास येतो. ८) भात शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी कधीही भांड्याचे झाकण उघडू नका, कारण भांड्याचे झाकण उघडल्याने भांड्यातील वाफ निघून जाते आणि तांदूळ कच्चा राहतो. ९) तुम्ही जर पुलाव बनवत असाल तर तांदूळ सारखा सारखा हलवू नका. त्यामुळे चव खराब होते. पण तुम्ही जर साधा भट करणार असाल तर असे करण्याने भाताची चव चांगली बनते.

Loading...

१०) शिजवलेले मांस त्वरित चावू नका, कारण शिजवल्यामुळे त्यामध्ये रस असतो. त्यातील रस निघून गेल्यानंतर खाल्ल्यास मांस चांगले चविष्ट लागते. ११) मांस फ्रिजमधून काढल्यानंतर लगेच शिजवू नका, फ्रिजमधून काढल्यानंतर ते काहीवेळ रुम टेंपरेचरला ठेवा आणि मग शिजवायला घ्या.

१२) पास्ता पाण्यात उकळताना तो सतत ढवळत रहा, जेणेकरुन तो खाली चिकटणार नाही. १३) जर तुम्ही भरपूर लोकांसाठी भाजी बनवत असाल तर ती पॅनमध्ये बनवा. जर त्यात आणखी काही पदार्थ टाकायचे असतील तर ते कोरडे करा. यामुळे ते चांगल्या रीतीने भाजले जातील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *