नवीन खासरेबातम्या

भारतात परतल्यानंतर मीराबाई चानूकडून खिलाडूवृत्तीचा परिचय, घेणार ट्रक ड्रॉयव्हर्सची भेट; ‘हे’ आहे कारण

भारताकडून यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकले ते मीराबाई चानूने. तिने फक्त पदकच जिंकून दाखवले नाही तर कठीण परिस्थितीमध्ये देखील विजय मिळवण्यापासून कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही हे देखील सिद्ध केले. अडचणी नक्कीच त्रास देतात मात्र तिने या सर्व अडचणींवर मात करत पदक पटकावले आहे.

टोकियो ऑलम्पिकमधून भारतात परतल्यानंतर मीराबाई चानूचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. त्याच बरोबर अनेकांनी तिला रोख रक्कम स्वरूपात बक्षीस दिले आहे. मात्र मीराबाई चानूने इथपर्यंत येण्यासाठी मोठ्या कठीण संघर्षाला तोंड दिले आहे. मीराबाई चानू भारतात आल्यानंतर ट्रक ड्रॉयव्हरचा शोध घेत होती अशी बातमी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाली होती आणि ही बातमी खरी होती.

मीराबाईला ट्रक ड्रॉयव्हर्सने मदत केली होती. त्यामुळे तिला मदत करणाऱ्या ट्रक ड्रॉयव्हरला भेटायचे होते. हे ट्रक ड्रॉयव्हर मीराबाई चानूला त्यांच्या नोंगपोक काकचिंग गावातून दररोज खुमान लुंपक क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रावर सोडत असत. त्याचबरोबर कधीही ते तिच्याकडून पैसे आकारत नव्हते.

चानूचे कुंटुंब हे अत्यंत गरीब आहे. तिच्या पालकांना दररोज तिला प्रशिक्षण देणे परवडत नव्हते. मीराबाई चानूच्या घरापासून प्रशिक्षण केंद्र सुमारे ३० किलोमीटर दूर आहे. तिला प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी १०-२० रुपये दिले जात असत. मात्र हे पैसे देखील तिथे पोहोचण्यासाठी कमी होते. त्यावेळी चानूने शक्कल लढवत ट्रक ड्रॉयव्हरकडून लिफ्ट मागण्यास सुरुवात केली.

तिला ट्रक ड्रॉयव्हरला मदत मागण्यास भीती आणि संकोच वाटायचा. मात्र तरीदेखील तिने हिंमत केली आणि ट्रकने प्रशिक्षण केंद्रात जाण्यास सुरुवात केली. नंतर ट्रक ड्रॉयव्हर सोबत ओळख झाल्यावर ते देखील दुरूनच हॉर्न देत असत जेणेकरून तिथे पोहोचेपर्यंत मिराबाई तयार होऊन बाहेर येईल. प्रवासासाठी दिलेल्या पैशांतून ती प्रशिक्षणादरम्यान खाण्यासाठी खाद्यपदार्थ खरेदी करायची.

त्यामुळे तिने आल्यानंतर मदत करणाऱ्या ट्रक ड्रॉयव्हरांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी मीराबाई चानूला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र कोणालाही तिने केलेले कठीण संघर्ष माहित नाही. असे असले तरीदेखील तिने आपले पाय जमिनीवर ठेवत खिलाडूवृत्तीचा परिचय घडवून आणला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button