Breaking News
Loading...
Home / बातम्या / या मौलवीला होत्या १३० बायका, त्याच्या निधनानंतर देखील जन्माला येत होते मुलं

या मौलवीला होत्या १३० बायका, त्याच्या निधनानंतर देखील जन्माला येत होते मुलं

छोटे कुटुंब सुखी कुटुंब हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. छोटे कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि २ मुलं असा त्याचा अर्थ असतो. पण आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या कुटुंबात त्याला १३० बायका आहेत व २०३ मुलं आहेत.

हे कुटुंब नायजेरियातील असून हा व्यक्ती एक मौलवी होता. मोहम्मद बेल्लो अबूबकर नावाच्या या मौलवीने २०१७ मध्ये जगाचा निरोप घेतला. आता कोरोनानंतर मोठ्या लॉकडाऊनमुळे जगात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मौलवी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading...

मोहम्मद बेल्लो अबूबकर च्या मृत्यूनंतर देखील त्याच्या मुलांचा जन्म झाला. त्याच्या मृत्यूसमयी अनेक पत्नी गर्भवती होत्या. त्यामुळे त्यांनी पतीच्या निधनानंतर बाळांना जन्म दिला. मौलवींचे कुटुंब आपल्या पूर्ण कुटुंबासोबत एका तीन मजली बिल्डिंगमध्ये राहायचा. विशेष म्हणजे मौलवीला एवढ्या बायका असताना देखील त्यांचे कधीच भांडण झाले नाहीत. त्या सोबत शांततेत राहायच्या.

अबूबकर यांचे निधन झाले असून त्यांना कुठलाही आजार नव्हता. त्यांनी मृत्यूपूर्वी कुटुंबासोबत गोष्टी पण केल्या होत्या. त्यांच्या अंतिम यात्रेत अनेक लोक सामील झाले होते. त्यांच्या अनेक पत्नी देखील खूप रडल्या होत्या.

अबूबकर जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचा विरोध झेलावा लागला. लोकांचं म्हणणं होतं कि त्यांनी ४ पत्नी सोडून बाकी सर्व पत्नीना घटस्फोट द्यावा. त्यांनी मात्र असे करण्यास नकार दिला. हे सर्व लग्न योग्य असल्याचे त्यांचे मत होते.

त्यांचा १३० बायकांपैकी १० बायकांसोबत घटस्फोट देखील झाला होता. त्यांचे लग्न इच्छा नसताना देखील आपोआप व्हायचे असे ते एकदा मुलाखतीत म्हंटले होते. ते एकदा हे पण म्हंटले होते कि मला अल्लाह ने एवढ्या बायका सांभाळण्यासाठी विशेष आशीर्वाद दिला आहे.

अबूबकर सोबत लग्न करणाऱ्या महिला स्वतःला सौभाग्यवान समजायच्या. त्या म्हणायच्या अबुबकर मध्ये काही तरी चमत्कारिक गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याशी लग्नाला कोणीच नकार देऊ शकत नाही. अबूबकर तर या जगात नाही राहिले पण त्यांचे कुटुंब आजही येथे राहते.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *