प्रेरणादायी

प्रत्येक कुटुंबात ‘एक उद्योजक’ तयार झाला पाहीजे असे स्वप्न बघणारा उद्योजक ‘मयुर रत्नपारखी’

महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबात ‘एक उद्योजक’ तयार झाला पाहीजे असे स्वप्न बघणारा उद्योजक ‘मयुर रत्नपारखी’

हा प्रवास सुरू होतो स्ट्रगल, अपयश, नुकसान, लोकांनी दिलेला धोका यातून. गोष्ट आहे तरुणांना उद्योजकते मध्ये आणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबात ‘एक उद्योजक’ तयार झाला पाहीजे असे स्वप्न बघणारा एका ध्येयवेडा मराठी तरुण मयुर माणिक रत्नपारखी राहते ठिकाण औरंगाबाद
(छ. संभाजीनगर) संपूर्ण पिढ्यात व्यवसायाचा लवलेशही नसतांना व शिक्षणास जास्त रस नसलेला घरची परिस्थिती जेमतेम असलेला जिद्दीच्या जोरावर व मेहनती वर विश्वास ठेवून आधी नोकरी करून व्यवसायात येण्याचे स्वप्न याने पूर्ण केले गेल्या ८ वर्षापासून व्यवसायिक आयुष्य जगत असताना बर्‍याचश्या अडचणी नुकसान फायदा या सगळ्या गोष्टी अनुभवून महाराष्ट्रातल्या तरुणांना कोणतीही अडचण येऊ नये त्यांना मदत करून महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींनी व्यवसाय केला पाहिजे यासाठी हा व्यक्ती काम करत आहे.

‘गर्जा महाराष्ट्र माझा!’
महाराष्ट्राने जगाला छत्रपती शिवाजी महाराज दिले ज्यांची कीर्ती ऐकून मोठे मोठे शत्रू सुद्धा त्यांचे कौतुक करायचे ‘संपुर्ण हिंदवी स्वराज्य’ याचे ध्येय ठेवणारे अशा राजांचा हा महाराष्ट्र व्यवसायात सुद्धा अग्रभागी का राहू नये आणि तो रहावाच प्रत्येक तरुण-तरुणी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होऊन आर्थिक व्यवस्थेला हातभार लावावा हीच या तरुणाची प्रबळ इच्छा.

‘शिवाजी महाराज आणि व्यवसाय’
शिवाजी महाराजांना कडून खुप गोष्टी आपण आपल्या व्यवसायासाठी शिकू शकतो, तुमची अर्थ सत्ता मजबूत असेल तर सर्व सत्ता तुमच्या जवळ लोळण घेतात, काही ठिकाणी तह करावा लागतो तर काही ठिकाणी युध्द परंतु आताचे युध्द हे शस्त्राचे नसुन तुमच्या कौशल्याचे आहे, त्यावेळी मुघूल हा प्रश्न होता त्याला राजांनी ‘हिदंवी स्वराज्य’ हे उत्तर देऊन एक व्हिजन सेट केले, राजांची माणसे जोडण्याची कला तसेच बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे याच्या सारख्या मावळ्यांना आपल्या टिम मध्ये घेणे, शिवाजी महाराजांकडे ४२२ किल्ले होते तसे आपले प्रत्येक तरूणाचे व्यवसायिक आर्थिक रिसोर्स पाहिजे यासाठी व्यवसाय करणे गरजेचे आहे आपली अर्थ सत्ता मजबूत पाहीजे,यासाठी व्यवसायच करणे गरजेचे आहे त्याला पर्याय नाही जर तुमच्या ७ पिढ्या सुखात ठेवायच्या असतील तर व्यवसाय हाच राजमार्ग आहे.

‘व्यवसायिक माहिती’
Sterbach Technologies Pvt Ltd ही सॅाफ्टवेअर कंपनी असून याच अॅप,सॅाफ्टवेअर,सोशल मेडिया मार्किटिंग करतात, तसेच बिर्याणी,इंडियन,चायनिज,फास्ट फुड,इटालियन यामध्ये औरंगाबाद मधील मोठे मल्टीब्रॅन्ड २ किचन, २ कॅफे व ‘दिवान-ए-बिर्याणी,बच्चन्स किचन’ हे फुड ब्रॅन्ड असून Annamrita Foods Concepts Pvt Ltd ही यांची एक Parent कंपनी आहे एका व्यक्ती पासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वटवृक्ष चे स्वरूप घेत आहे ‘माणसं कमवा हीच व्यवसायाची असेट’ हे ब्रीदवाक्य घेऊन छ.शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा तरुण कार्य करत आहे.

‘महाराष्ट्राची सध्यस्तिथी’
महाराष्ट्रातला एक उद्योग कुठे गेला तर आर्थिक बजेट ला फरक पडतो, संपुर्ण राज्य ढवळून निघते, तरूण बेरोजगार होतो, पैसे चे चक्र फिरण्यासाठी अडचणी येतात, तरूण शहराकडे वळतो पण यासाठी तरूणांनी संपुर्ण जबाबदारी शासनाकडे न दाखवता आपणच तसे उद्योग का उभे करू नये यासाठी प्रयत्नशिल हवे असे त्याचे मत.

‘सुरू केला इंटरनॅशनल ब्रँड ला टक्कर देणारा मराठी बिर्याणी ब्रँड ‘दिवान-ए-बिर्याणी’
-भारतात सर्वात जास्त चालणारा पदार्थ बिर्याणी व मराठी तरुणाने तो करावाच यासाठी ब्रँड तयार करून आत्तापर्यंत २५००० अधिक बिर्याणी महाराष्ट्रात विकण्याचा विक्रम प्रस्थापित केला तसेच मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हीच्या कडून पुरस्कार देखील प्राप्त केला, या व्यवसायात कमीत कमी गुंतवणूक, उत्तम गुणवत्तेची हमी,१००% नफा देणारा व संपुर्ण महाराष्ट्रभर त्याच्या फ्रंन्चाईजीसाठी देखील प्रचंड मागणी आहे.
ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे पण मार्ग माहित नाही अशासाठी ही सुवर्णसंधीच त्याने निर्माण केली आहे याचा प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणाने फायदा घेऊन रोजगार दिला पाहिजे व ‘एक कुटूंब – एक उद्योजक’ असे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

‘कौटुंबिक सहकार्य’
तन,मन व धनाने व्यवसाय हेच ब्रीद वाक्य असताना कौटुंबिक सहकार्य हे अत्यंत गरजेचे यात साथ देणारी त्याची बायको,आई वडील, भाऊ, आजी व बॅकबोन मामा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कुटंब सोबत असेल तर संपुर्ण जगाशी आपण सामना करू शकतो व उद्योगात देखील फायदा होतो असे मत त्याचे आहे.

‘तरुणांसाठी संदेश’
कोणताही व्यवसाय छोटा व मोठा नसतो करणारा विचाराने मोठा असावा लागतो. फक्त माहिती घेऊन उपयोग होत नाही कृती करणे गरजेचे आहे, आत्मविश्वास ठेवा परिणामाची चिंता करू नका, वृक्ष व्हायचं असेल तर बी पेरावेच लागेल, बिनधास्त व्यवसायात उतरा, Action घ्या. लवकरच महाराष्ट्रातल्या तरूणासाठी तयार करणार ‘महाराष्ट्र उद्योजक समूह’

संपर्क करू शकता,
09860 098889
09028 292989

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button