Breaking News
Loading...
Home / आरोग्य / दोन जननेंद्रिय असणारा “हा” माणूस आयुष्यभर जगासाठी एक कोडं बनून राहिला

दोन जननेंद्रिय असणारा “हा” माणूस आयुष्यभर जगासाठी एक कोडं बनून राहिला

कधीकधी अशाही काही आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात ज्या पाहिल्यानंतर आपल्याला देखील प्रश्न पडतो की, असेही होऊ शकते काय ? लिंग, रंग आणि आकार सोडला तर निसर्गाने जगातल्या सर्व माणसांना एकसारखे बनवले आहे. असे असूनही समाजात अशीही काही माणसं जन्माला येतात, ज्यांच्याकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी असते. १९ व्या शतकात असाच एक माणूस होऊन गेला ज्याला एक नाही, तर दोन जननेंद्रिये होती. पाहूया त्या अवलियाबद्दल…

कोण आहे तो आगळावेगळा माणूस ?

Loading...

फ्रान्सेस्को फ्रॅंक लेंटिनी असे त्या व्यक्तीचे नाव असून १८ मे १८८९ रोजी त्याचा जन्म झाला. तो इटलीच्या सिसिली बेटावर राहायचा. निसर्गाने त्याला असामान्यपणे जन्माला घातले होते. फ्रान्सेस्कोला दोन जननेंनद्रिये, तीन पाय आणि चार पावले होती. वास्तविक पाहता फ्रान्सेस्को एका विकाराने पीडित होता, ज्यामध्ये त्याच्या शरीराला अर्धे जुळ्या मुलाचे शरीर जोडले गेले होते. तो अर्धा मुलगा फ्रान्सेस्कोच्या माणक्याशी जोडलेले होते. फ्रान्सेस्को आयुष्यभर तीन पाय घेऊनच जगला.

फ्रान्सेस्कोने आपल्या तिसऱ्या पायाचा असा उपयोग केला

फ्रान्सेस्कोच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याचा स्वीकार करायला नकार दिल्यानंतर त्याच्या काका-काकीने त्याला सांभाळले. आपल्या कमजोरीला कमीपणा न मानता फ्रान्सेस्कोने त्याला ताकत बनवले. त्याच्या तिसऱ्या पायामुळे त्याला सर्कसमध्ये काम मिळाले. तीन पाय असूनही तो अतिशय चपळ होता. आपल्या तिसऱ्या पायाने तो फुटबॉलला किक मारायचा. अनेकदा तिसऱ्या पायाचा उपयोग तो बसण्यासाठी स्टूल म्हणून करायचा. त्याला दरवेळी बुटांच्या दोन जोड्या विकत घ्याव्या लागायच्या.

फ्रान्सेस्कोच्या हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धीवर टेरेसा नावाची एक मुलगी फिदा झाली. दोघांनी नंतर लग्न केले. त्यांना चार मुलेही झाली. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. फ्रान्सेस्कोने नंतर हेलेन शुपे नावाच्या महिलेशी लग्न केले. २१ सप्टेंबर १९६६ रोजी त्याचे निधन झाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *