Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / …म्हणून बाळासाहेब ठाकरे चक्क राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर राहायला गेले होते!

…म्हणून बाळासाहेब ठाकरे चक्क राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर राहायला गेले होते!

नुकतेच महाराष्ट्रावर महापुराचे संकट कोसळले होते. कोल्हापूर, सांगली, चिपळूण, कोकण यांना पुराचा मोठा फटका बसला . मुंबईत देखील असाच पूर एकदा येऊन गेला. २००५ साली २६ जुलै रोजी मुंबईत महाप्रचंड असा जलप्रलय आला. मुंबईत तेव्हा ९०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला होता आणि अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. त्या वेळी पाण्याची पातळी देखील चांगलीच होती.

त्यावेळी अनेक इमारती, घरे तसेच इतरही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. मुंबईतील लोकल ट्रेन्स देखील बंद होत्या. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीत देखील पाणी शिरले होते. अनेक जणांना या पुरात आपले प्राण गमवावे लागले होते. मोठ्या प्रमाणावर मुंबईत पाणी शिरल्याने याची मोठी चर्चा देशभरात झाली होती.

Loading...

त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वर्चस्व संपूर्ण मुंबईवर होते. मुंबईतल्या पुराचा फटका ठाकरे घराण्याला देखील चांगलाच बसला होता. मिठी नदीच्या पातळीत देखील त्यावेळी वाढ झाली होती. अशा स्थितीत मुंबईच्या काही इमारतींच्या पहिल्या मजल्यावर देखील पाणी शिरले होते.

त्यावेळी मुंबईत शिवसेनेची सत्ता होती. मातोश्रीत पाणी शिरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीसह मुंबईतील एका हॉटेलमध्ये स्थलांतर केले होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र हॉटेलमध्ये राहण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि आपले पुतणे म्हणजेच राज ठाकरेंच्या दादर येथील कृष्णकुंज निवास्थानी राहण्याचे ठरवले.

त्यावेळी बाळासाहेबांचे वय जास्त होते. त्यांना त्यावेळी रेस्क्यू बोटने बाळासाहेबांना बाहेर आणून एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि नंतर त्यांना राज साहेबांच्या कृष्णकुंजवर हलवण्यात आले. बाळासाहेब राज ठाकरेंच्या घरी वास्तव्यास आल्याने त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती कारण त्यावेळी शिवसेनेत राज विरुद्ध उद्धव असा संघर्ष सुरु होता.

त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. ही आठवण राज ठाकरेंनी एकदा सभेतून सर्वांना सांगितली होती. बाळासाहेब कृष्णकुंजवर वास्तव्यास असताना शिवसेनेत होणारी त्यांची अडचण शिवसेनाप्रमुखांना बोलून दाखवली होती.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *