महाराष्ट्र राज्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्या प्रकाशात यायला हव्यात . त्यांना पुढे घेऊन येऊन त्या माध्यमातून वेग वेगळ्या चांगल्या गोष्टी होऊ शकतात. आपण जर सर्वसाधारण विचार केला तर कळून चुकते की गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातच जास्त प्रमाणावर बरवा आहेत. पण महाराष्ट्र राज्यात पण तब्बल १६५० बारवा असल्याची माहिती रोहन काळे यांनी दिली आहे.
रोहन काळे हे महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आहेत. रोहन काळे यांनी मोहन सिनकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्यातील बारवा शोधून काढल्या आहेत. त्यांनी बाईक वर असताना चांगले वाईट अनुभव त्यांना आले आहेत. त्यांनी वडापाव खाऊन दोन दोन दिवस काढले आहेत. त्यानंतर एकदा अमरावतीमध्ये असताना त्यांच्या गाडीचा टायर फाटला होता.
त्यानंतर त्यांना पुढे जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाणी त्यांना एक ग्रुप भेटला. त्या ग्रुपमध्ये त्यांना ५ जण भेटले होते. त्यांना मिळून बारवा शोधून काढल्या. त्यांनी १ मार्च २०२२ रोजी १२५ बारवा शोधून काढल्या आहेत. त्यानंतर लोकांना भेटून त्यांचे संघटन जमवले. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात मोठे कार्य उभे केले.
त्यानंतर १ मार्च या दिवशी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर दीप प्रजवलन करण्यात आले. बारवांच्या ठिकाणी साफसफाई केल्यानंतर तिथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. रोहन काळे यांनी यावेळी मी आयुष्यात बारवा शोधण्याचे काम करून काहीतरी कमावले असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कार्याला खास रे परिवाराचा सलाम.