महाराष्ट्राच्या मुलाने ऑलिम्पिकमध्ये गाजवली कामगिरी; प्रवीणने या खेळाडूला टाकले मागे

ऑलिम्पिक स्पर्धा कधी एकदा होणार आहेत याकडे सर्व प्रेक्षक डोळे लावून बसले होते. टोकियो ऑलिम्पिकला शुक्रवार दिनांक २३ जुलैला सुरुवात करण्यात आली आहे. काही स्पर्धाना ऑलिम्पिक स्पर्ध्येचे उदघाटन झाल्यानंतर सुरुवात होणार आहे तर काही स्पर्धाना ऑलिम्पिक उद्घाटनाच्या आधीच सुरुवात झाली आहे.
तिरंदाजी खेळामध्ये भारतीय संघाकडून प्रवीण जाधव हा खेळाडू खेळत आहे. पात्रता फेरीमधूनच त्याने जबरदस्त सुरुवात केली आहे.
भारतीय संघाकडून पदकाची दावेदार असणाऱ्या अतानु दासपेक्षा प्रवीणने जास्त गुण मिळवले आहेत. त्यामुळे आता प्रवीणच्या भविष्यातील कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
मिश्र दुहेरीमध्ये प्रवीण दीपिकासोबत खेळताना दिसून येणार आहे. ऑलिम्पिक मध्ये तिरंदाजी खेळाचा पहिल्यांदाच यावेळी समावेश करण्यात आला आहे. दीपिका आणि प्रवीण हे दोघे भारताकडून मिश्र दुहेरी मध्ये खेळणार आहेत. त्यांच्या समावेशाने भारताच्या या गटात पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मिश्र दुहेरीमध्ये दीपिका आणि प्रवीण दोघांचा समावेश आशादायी आहे. दीपिका आणि प्रवीण दोघांना या गटात संयुक्तपणे नववे स्थान देण्यात आले आहे. अताणू आणि दीपिका या दोघांनी ऑलिम्पिक स्पर्ध्येपुर्वी सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी पदक जिंकल्यामुळे दोघे सोबत खेळणार असल्याचे वाटत होते.
पण आर्चरी संघटनेने दिलेल्या निर्णयामुळे सगळीकडून चकित करणारे विधान येऊ राहिले आहेत. प्रवीण आणि दीपिका दोघेही भारतीय संघाकडून खेळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता प्रवीण आणि दीपिका दोघे भारताला पदक मिळवून देणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.