Breaking News
Loading...
Home / बातम्या / वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरणारा ‘तो नेता’ झाला आता कॅबिनेट मिनिस्टर!

वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरणारा ‘तो नेता’ झाला आता कॅबिनेट मिनिस्टर!

महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार आता स्वीकारला आहे. या सरकारमध्ये अनेक तरुण आमदारांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. यापैकी एक नाव म्हणजे धनंजय मुंडे. मुंडे यांना ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून मोठी जबाबदारी मिळाली आहे.

पूर्वी लोकांच्या कामासाठी आपण मंत्रालयात यायचो तेव्हा एक वडापाव खाऊन दिवस दिवस काढायचो आणि मंत्रालयातील लोकांच्या कामांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचो, त्यावेळी याच मंत्रालयात कधी आपण मंत्री होऊन येऊ असे वाटले नव्हते, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त केली.

Loading...

मुंडेंनी पदभार स्वीकारताच आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी अनेकांनी दालनात गर्दी केल्याने कार्यालय अक्षरशः हाऊसफुल झाले होते. मुंडे यांचा हा राजकीय प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. धनंजय मुंडे यांनी २०१२ साली भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर सात वर्षांनंतर धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी यापूर्वी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख गेली. खासरेवर जाणून घेऊया त्यांचा राजकीय प्रवास थोडक्यात..

जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री-

धनंजय मुंडे यांची ओळख एक आक्रमक, हजरजबाबी, सर्वसमावेशक नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आपल्या अभ्यासू वक्तृत्व शैलीमुळे ते परिचित आहेत. कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे त्यांनी २०१२ साली भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. त्यांनी भाजपमध्ये असताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

२०१२ मध्ये बंडखोरी करून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता. पुढे विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पकंजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातून पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र त्यांना ताकद दिली. २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मोठी जबाबदारी मिळाली.

या संधीचं सोनं करत त्यांनी आपल्या आक्रमक भाषण शैलीने फडणवीस सरकारविरोधात रान उठविले. सोबतच त्यांनी मतदारसंघात देखील लक्ष केंद्रित करून जोरदार बांधणी केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा ३० हजाराच्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री म्हणून मोठी जबाबदारी मिळाली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *