Breaking News
Loading...
Home / बातम्या / टेलरने चड्डी खूप आखूड शिवली म्हणून सुरु झाली कायदेशीर लढाई, पोलीस म्हणाले…

टेलरने चड्डी खूप आखूड शिवली म्हणून सुरु झाली कायदेशीर लढाई, पोलीस म्हणाले…

आपल्या देशात खरोखर एकापेक्षा एक क्वालिटीबाज लोकं सापडतात. काय करतील त्याचा नेम नाही. कधीकधी त्यांच्या अशा कारनाम्यांवर हसावं का रडावं कळत नाही. एखाद्या दुकानदाराने खराब वस्तू दिल्यास किंवा ती वस्तू बदलून न दिल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करणारे लोक आपण अनेकदा पाहिले असतील. परंतु तुम्ही कधी एखाद्या ग्राहकाने एका अंडरवियरसाठी पोलिसा कंप्लेंट झाल्याचे बघितले आहे का ? नाही ना ! पण असं घडलंय…

प्रकरण भोपाळच्या हबीबगंज येथील आहे. एका व्यक्तीने कपडे शिवणाऱ्या टेलरवर आखूड चड्डी शिवल्याचा आरोप करुन त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली आहे. कृष्ण कुमार दुबे असे त्या तक्रारकर्त्याचे नाव असून त्याच म्हणणं आहे की त्याने त्याच्या शेजारच्या टेलरकाम करणाऱ्या एका व्यक्तीला चड्डी शिवण्यासाठी २ मीटर कापड दिले होते. परंतु त्या टेलरने चड्डी खूप आखूड शिवली. जेव्हा दुबे यांनी त्या टेलरला चड्डी दुरुस्त करुन द्यायला सांगितली, तेव्हा टेलरने नकार दिला.

Loading...

टेलरच्या नकारामुळे दुबे रागावले आणि त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. दुबे यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लिखित स्वरूपात टेलरविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याने पोलिसांना विनंती केली आहे की त्याची तक्रार स्विकारुन टेलरविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. ही अनोखी तक्रार पाहून पोलिसही चकित झाले आहेत. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना सुचेना झालंय.

नंतर मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की अशा प्रकारच्या तक्रारींवर आम्ही कारवाई करु शकत नाही. त्यांनी दुबेंना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी तुम्ही याविरुद्ध न्यायालयात दाद मागू शकता असे म्हणून पोलिसांनी त्यांना सुचवले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *