Breaking News
Loading...
Home / बातम्या / सलमान खानच्या बहिणला घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार हा अभिनेता

सलमान खानच्या बहिणला घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार हा अभिनेता

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि कृति खरबंदाचे रिलेशनशिप चांगलेच चर्चेत आले आहे. पुलकित सम्राट कृति खरबंदाला डेट करतोय. दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार पुलकित आणि कृति लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. कृती खरबंदाने ‘शादी में जरूर आना’ आणि ‘हाउसफुल 4’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

मीडियामध्ये त्यांच्या अफेअर बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या होत्या पण कृतीनेच आपल्या रिलेशनबद्दल एका इंटरव्हिव मध्ये उलगडा केला होता. तिने सांगितले होते कि हि अफवा नाहीये, आम्ही खरोखर एकमेकांना डेट करत आहोत.

Loading...

कुटुंबियांना द्यायची आहे माहिती-

कृतीने रिलेशनबद्दल लवकर उलगडा न करण्यामागे एक कारण असल्याचे सांगितले होते. ती आपल्या कुटुंबियांना याबद्दल अगोदर माहिती देऊ इच्छित होती. त्यांच्या रिलेशनला आता ९ महिने उलटून गेले आहेत. लवकरच पुलकित आणि कृतिचे कुटुंबीय एकमेकांची भेट घेणार आहेत.

पुलकितच्या चुलत भावाच्या लग्नाचे आमंत्रण कृतिलासुद्धा देण्यात आले आहे. याच दरम्यान ही भेट होणार असल्याची चर्चा आहे. गोव्यात ही लग्न होणार आहे. रिपोर्टनुसार कृतिला भेटण्यासाठी पुलकितची फॅमिली खूपच उत्सुक आहे. त्यामुळे या लग्नादरम्यान दोघांच्या नात्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

सलमानच्या बहिणीला पुलकितने दिला आहे घटस्फोट-

कृतीसोबत रिलेशनमध्ये येण्यापूर्वी पुलकित सम्राटचे नाव यामी गौतम सोबत जोडले जायचे. पुलकितचे यापूर्वी लग्न देखील झालेले आहे. त्याचे लग्न सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याने तिला घटस्फोट दिला.

या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले होते. आता पुलकितच्या लाईफमध्ये कृतिची एंट्री झाली आहे.कृति आणि पुलकित वीरे की वेडिंग सिनेमात देखील एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

कृतिने काही दिवसांपूर्वी पुलकितला डेट करत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. त्यांचे रिलेशन म्हणजे अफवा बोलले जायचे पण त्यांनी याला दुजोरा दिला. दोघे दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. कृती फक्त आपल्या पालकांना हि गोष्ट सर्वात आधी सांगू इच्छित होती. कृतीच्या मते प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *