Breaking News
Loading...
Home / बातम्या / SRH ला चिअर करण्यासाठी प्रत्येक मॅचमध्ये दिसणारी हि तरुणी कोण आहे माहिती आहे का?

SRH ला चिअर करण्यासाठी प्रत्येक मॅचमध्ये दिसणारी हि तरुणी कोण आहे माहिती आहे का?

आयपीएल सुरु होऊन जसा जसा वेळ जात आहे तसं आता रंगत वाढायला सुरुवात झाली आहे. काल झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबाद ने दिल्ली कॅपिटल्स वर विजय मिळवला. या सामन्यापूर्वी दिल्लीने पहिले दोन्ही सामने जिंकून चांगली सुरुवात केली होती.

काल झालेल्या सामन्यात हैद्राबादने दिल्लीसमोर १६३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. जॉनी बेअरस्ट्रो आणि केन विलियम्सन यांच्या दमदार खेळीच्या बळावर हैद्राबादने ४ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला.

Loading...

लक्ष्याचा पाठलाग करताना DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) 2 धावांवर पहिल्याच षटकात माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याला बाद केलं. शिखर धवन ( 34), रिषभ पंत ( 28) आणि शिमरोन हेटमायर ( 21) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना अपयश आलं. दिल्लीला 7 बाद 147 धावा करता आल्या. हैदराबादनं 15 धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधले. तिच्यावर कॅमेऱ्याची नजर पडल्यानंतर अनेकांची विकेट पडली. ती हैद्राबाद संघासाठी चिअर करताना दिसली. हि तरुणी हैद्राबादला चिअर करण्याची हि पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील अनेक सामन्यात ती चिअर करताना दिसली आहे. आता ती हैद्राबादला चिअर करण्यासाठी दुबईला पोहचली आहे.

अनेकांना प्रश्न पडला असेल कि हि तरुणी नेमकी कोण आहे? तर जाणून घेऊ ती कोण आहे. SRH ला चिअर करणारी हि तरुणी एखादी सामान्य फॅन नसून ती सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी काव्या मारन आहे. काव्या सनरायझर्य हैदराबाद संघाची सहमालक देखील आहे.

काव्या हि यावर्षीच्या आयपीएलसाठी ऑक्शन झालं त्यावेळी देखील दिसली होती. ती टीमसाठी बोली लावताना नजरेस पडली होती. तिची तेव्हापासून चर्चा सुरु झाली होती. काव्याचे वडील कलानिधी हे सन टेलिव्हिजन नेटवर्कचे मालक आहेत. काव्या त्यांचा बिजनेस देखील सांभाळते. काव्या हि त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *