अभिनेत्री केतकी चितळे कायमच वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत येत असते. अनेक वेळा ती कायम शरद पवार यांच्यावर टीका करत असते. यावेळी तिने फेसबुक पोस्टमधून तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक अशा शब्दांमधून टीका केली आहे.
केतकी चितळे बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यामध्ये ती मुंबईकर असून तिचा जन्म मुंबई येथेच झाला आहे. ३० डिसेंबर १९९२ रोजी तिचा जन्म झाला होता. तिने तिच्या कारकिर्दीतील अस्तित्व ही मालिका केली होती. या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती.
तिने डर्टी पिक्चर या चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटात तिने विद्या बालनला डान्स शिकवला होता. सास बिना ससुराल या सोनी टीव्हीवरच्या कार्यक्रमात तिने भूमिका केली होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये भूमिका केल्या आहेत. पॉंड्स, गोदरेज हेअर कलर या जाहिरातींमध्ये भूमिका केली आहे. ती अनेक मराठी मालिकांमध्ये चमकली आहे.
तिने मिस्टर आणि मिसेस सदाचारी या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. केतकी चितळे कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. यावेळी तिला शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. या आधी तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे त्यावेळीही तिच्यावर टीका केली होती.