Breaking News
Loading...
Home / आरोग्य / केळीच्या सालाचे ‘असे’ आहेत फायदे ; जाणून घ्या संपूर्ण माहिती ‘केळीच्या सालाच्या फायद्याबद्दल’

केळीच्या सालाचे ‘असे’ आहेत फायदे ; जाणून घ्या संपूर्ण माहिती ‘केळीच्या सालाच्या फायद्याबद्दल’

आपल्यातील कित्येक लोकांना केळापासून आणि दुधापासून बनवलेले शिकरण खूप आवडते. अनेक जण वजनवाढीसाठी देखील प्रोटीन आणि केळापासून बनवलेला शेक पितात. केळीमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि मुख्यत्वे कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असते. आपल्यातील अनेकांना केळीच्या फायद्यांबद्दल माहिती आहे मात्र केळीच्या सालाचेही अनेक फायदे आहेत.

केळीची साल जर आपण चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते. फक्त एवढेच नाही तर केळीच्या सालीमुळे अनेक आजार देखील बरे होण्यास मदत होते. केळीच्या सालामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि नियमीतपणे केळीच्या सालाचे सेवन केल्यावर आपल्या पाचन तंत्रामध्ये देखील सुधारणा होण्यास मदत होते.

Loading...

बद्धकोष्ठता, अतिसाराच्या त्रासांपासून देखील केळीच्या सालीमुळे मुक्त होण्यास मदत होते. आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स जर तयार झाली असतील तर आपण केळी वापरू शकतो. यासाठी केळीच्या सालीमध्ये कोरफड मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावावं. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवावा. हा उपाय आठवड्यातून ३ दिवस करून पाहिल्यास नक्कीच फरक जाणवतो.

तज्ज्ञांच्या मतानुसार आठवड्यातून एकदा जर केळीची साल आपण दातांवर चोळली तर दात चमकून निघतात. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध आहे आणि यामुळे दातांवरील पिवळेपणा जाण्यास मदत होते.

केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीच्या सालीचा वापर करू शकतात. यासाठी ३ चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालीची पूड घ्या आणि ग्राईंडरमध्ये गोष्टी बारीक करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवून काढा.

एका अभ्यासानुसार केळीच्या सालामध्ये बायोएक्टिव संयुगे असतात. ज्यात कॅरोटिनॉइड्स आणि पॉलिफेनॉल आहेत. हे अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांसह समृद्ध आहेत जे पोटदुखीपासून मुक्त होण्यास मदत होते.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *