काय सांगता! निरोगी शरीरासाठी ‘या’ धातूंच्या ताटात जेवणं करणं आहे लाभदायक

निरोगी शरीरासाठी सकस आहार पाहिजे असे आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून सांगितले जाते. मात्र फक्त सकस आहारच नाही तर आपण कोणत्या ताटात खातो या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी महत्वाच्या असतात. सध्या आपण जेवणासाठी चिनी माती अथवा स्टीलच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करत असतो.
सणासुदीला किंवा पाहुणे आल्यानंतर काही ठिकाणी रोजच्यापेक्षा थोडी वेगळी भांडी वापरली जातात. काही ठिकाणी झाडांच्या पानांवर तर काही ठिकाणी मातीच्या भांड्यांमधून खाल्लं जातं. याबाबत आयुर्वेदाचार्य डॉ. राहुल चतुर्वेदी आणि मेडिकल कॉलेजचे सहायक प्रोफेसर डॉ. भारत भूषण यांनी आयुर्वेदानुसार कोणत्या भांड्यांमध्ये जेवल्यानं शरीराला फायदे मिळतात याबाबत सांगितले आहे.
डॉ. भारत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे राजा, महाराजा हे नेहमीच सोन्या-चांदीच्या थाळीत जेवायचे. कारण तेव्हा शत्रूंकडून जेवणात विष मिसळण्याची भीती असायची. विष चांदीमध्ये अथवा सोन्यामध्ये एकत्र झाल्यानंतर त्याची चव आणि खाण्याच्या रंगात बदल होतो.
सध्या सोन्याच्या ताटात जेवताना कोणीही दिसत नाही. मात्र राजा महाराजच्या काळात सोन्याच्या थाळीचा वापर केला जात होता. तज्ज्ञांच्या मते शरीरातील धातू ६५ अकार्बनिक पदार्थ आणि ३५ टक्के कार्बनिक वस्तूंपासून तयार झालेले असतात. या धातूंमुळे शरीराला मिळणारे फायदे वाढवण्यासाठी सोनं फायद्याचं ठरतं. अँटी बायोटिक जस आजारानं दूर ठेवतं तसंच काम या धातूंद्वारे केलं जातं.
आयुर्वेदानुसार पितळाचं ताट बुद्धी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पितळाच्या भांड्यात जेवण जास्तवेळ गरम राहतं. पितळाच्या भांड्यात जेवण केल्यामुळे शरीराच्या पीएच लेव्हल नियंत्रणात राहतं. तसेच पितळाच्या ताटात जेवल्यानं अन्नातील सर्व पौष्टिक घटकांचे मूल्य वाढवते. त्याच प्रमाणे गॅसचा त्रास देखील होत नाही.
चांदी रक्ताचे शुद्धीकरण करते. शरीराची उष्णता थंड करते. चांदीच्या ताटात खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तांब्याच्या ताटात कधीही जेवण करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नसते. कारण तांबे विशिष्ट पदार्थांसह प्रतिक्रिया देतो आणि खाणे त्यामुळे विषारी होऊ शकते. तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.