Breaking News
Home / बातम्या / कंगनाच्या आईने केली मोठी घोषणा, म्हणाल्या आधी आम्ही काँग्रेसचे होतो पण आता..

कंगनाच्या आईने केली मोठी घोषणा, म्हणाल्या आधी आम्ही काँग्रेसचे होतो पण आता..

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. कंगनाने मागील काही दिवसात वादग्रस्त वक्तव्याची शृंखलाच सुरु केली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. कंगनावर यामुळे टीकेची झोड उडाली होती.

कंगनाला मुंबईत आल्यास धडा शिकवू अशी ध मकी शिवसेनेकडून देण्यात आली होती. त्यानंतर कंगनाने ग्रह मंत्रालयाकडे सुरक्षा मागितली. ग्रह मंत्रालयाने तिने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. काल कंगनाच्या मुंबईतील ऑफिसवर महापालिकेने मोठी कारवाई करत हातोडा चालवला आहे.

कंगना काल वाय प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईत दाखल झाली. दरम्यान कंगनाला मोठी सुरक्षा दिल्यानंतर तिच्या आईने मोठी घोषणा केली आहे. कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचलच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्याने आम्ही भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे.

कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. तेव्हा आशा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे आश्वासन दिले.

कंगनाचे कुटुंबीय आहे काँग्रेसी विचारधारेचे-

कंगनाला राजकीय पार्श्वभूमी आहे. कंगनाची पणजोबा सर्जू सिंह हे गोपालपूरचे आमदार होते. त्यामुळे तिचे कुटुंबीय खूप पूर्वीपासून काँग्रेसी विचारधारेचे समर्थक राहिले आहे. पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीत कंगनाने भाजपकडे आपला कल वाढवला. ती मागील अनेक काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेहमी स्तुती करताना दिसते.

तिची भाजपची जवळीक पाहता आणि तिच्या समर्थनार्थ उतरलेले भाजपचे नेते बघता लवकरच ती भाजपमध्ये दिसल्यास नवल वाटायला नको. कंगनाच्या आईने तिच्या भाजप प्रवेशाला एकप्रकारे हिरवा कंदीलच दिला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *