Breaking News
Home / बातम्या / कंगनाला देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचा महिन्याला किती खर्च होतो माहिती का?

कंगनाला देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचा महिन्याला किती खर्च होतो माहिती का?

सुशांतसिंग प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर विरोधकांनी खूप आरोप केले. महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार वाद यानिमित्ताने निर्माण झाला होता. सुशांत प्रकरणावरूनच कंगनाने वादात उडी घेतली. तिचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत याच वादातून टोकाचे मतभेद झाले. दरम्यान तिने शिवसेनेवर पातळी सोडून टीका केली. मुंबईची तुलना थेट पीओके सोबत केल्याने कंगनावर खूप टीका झाली.

कंगना रानौतने मुंबईत राहायला असुरक्षित वाटत असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर कंगनाला केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली होती. हि सुरक्षा दिल्यानंतर देखील कंगना आणि केंद्र सरकारवर शिवसेनेने टीका केली होती.

कंगना जेव्हा मुंबईत आली तेव्हा ती या सुरक्षेच्या गराड्यात मुंबईत दाखल झाली होती. तिला मुंबई पोलिसांचे देखील सुरक्षा कवच विमानतळावर मिळाले होते. तिचा विरोध करण्यासाठी विमानतळावर असंख्य सेना कार्यकर्ते जमा झाले होते.

शिवसेना आणि कंगना यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली होती. मात्र तिच्या प्रक्षोभक विधानांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडले होते. त्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची तुलना राम मंदिरा आणि बीएमसीची तुलना बाबरच्या सैन्याशी केली होती.

दरम्यान या वादानंतर आता कंगनाच्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकार करत असलेल्या खर्चावर लोक प्रश्न करायला लागले आहेत. कंगनाला दिलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचे महिन्याला १० लाखाहून अधिक पैसे खर्च होतात. हा खर्च व्यर्थ जात असल्याचा प्रश्न एका वकिलाने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या ब्रिजेश कलाप्पा यांनी कंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यासाठी केंद्र सरकाराला दर महिन्याला १० लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणाऱ्या लोकांचा आहे.

मात्र आता कंगना हिमाचल प्रदेशमध्ये सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का? अशी विचारणा या वकिलाने ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *