Breaking News
Home / बातम्या / एकेकाळी कपडे खरेदी करण्यास कंगनाकडे नव्हते पैसे, आज आहे करोडोंची मालकीण

एकेकाळी कपडे खरेदी करण्यास कंगनाकडे नव्हते पैसे, आज आहे करोडोंची मालकीण

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रानौत मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. तिचा महाराष्ट्र सरकार आणि खासकरून शिवसेनेसोबत झालेला वा द यामागचे कारण ठरला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री असलेली कंगना आज करोडो रुपयांची मालकीण आहे. तिच्याकडे महागड्या प्रॉपर्टी आहेत, जगातील सर्वकाही आलिशान ती घेऊ शकते. पण कंगनाच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा ती स्वतःसाठी कपडे देखील खरेदी करू शकत नव्हती.

कंगनाकडे एकेकाळी मोठ्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी असे कपडे देखील नव्हते जे ती घालून त्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकेल. कंगनाची त्या वाईट काळात तिच्या एका मित्राने तिची खूप मदत केली होती.

कंगनाने २००९ मध्ये एका इव्हेंटमध्ये सहभागी होताना जो लूक केला होता तो बघून सर्वच जण हैराण झाले होते. पिवळा फ्रॉक घालताना कंगनाने गळ्यात ज्वेलरी ऐवजी रिबीन घातली होती. तिचे हा अवतार बघून सर्वच जण हैराण झाले होते. तिला खूप टीका देखील झेलावी लागली होती.

कंगनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता कि तिच्याकडे एकेकाळी चांगले कपडे खरेदी करण्यास पैसे देखील नव्हते. तिच्याकडे असे चांगले कपडे नव्हते जे घालून ती मोठ्या अवॉर्ड शोमध्ये जाऊ शकेल. ती त्यावेळी बॉलिवूडमध्ये खूप स्ट्रगल करत होती. ती तिच्या घरून मुंबईला फक्त १५०० रुपये घेऊन आली होती.

तिच्या या कठीण काळामध्ये तिला डिझायनर रिक रॉय याने खूप मदत केली होती. त्यावेळी रिक देखील खूप स्ट्रगल करत होता तरी त्याने माझी खूप मदत केल्याचं कंगनाने म्हंटल होतं. तो कंगनासाठी स्वतः अवॉर्ड शोमध्ये जाण्यासाठी ड्रेस डिजाईन करून द्यायचा. त्याच्यामुळे तिला अवॉर्ड शोमध्ये जाऊन ट्रॉफी घेता यायची.

कंगना आहे करोडोंची मालकीण-

कंगनाचे जे मुंबईतील ऑफिस महापालिकेने तोडले त्याची किंमत तब्बल ४८ कोटी रुपये होती. कंगना आज महागड्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. ती एका सिनेमासाठी ११ कोटी रुपये घेते. ती जाहिरातींसाठी देखील १-२ कोटी रुपये घेते. सीए नॉलेज या वेबसाईटच्या माहितीनुसार कंगनाची संपत्ती हि ९६ कोटी रुपये आहे.

कंगनाने रियल इस्टेट मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. शिवाय कंगनाला महागड्या लक्जरी कारचा देखील शौक आहे. कंगनाकडे दीड कोटीची बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि एक ७३ लाखाची मर्सिडीज बेंज GLE SUV हि महागडी गाडी आहे. याशिवाय देखील तिच्याकडे अनेक गाड्या आहेत.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *