Breaking News
Loading...
Home / आरोग्य / काळ्या हरभाऱ्यांचे ‘हे’ आहेत फायदे ; काळे हरभरे खा आणि ‘या’ आजारांना दूर पळवा

काळ्या हरभाऱ्यांचे ‘हे’ आहेत फायदे ; काळे हरभरे खा आणि ‘या’ आजारांना दूर पळवा

काळे हरभरे हे नाव आपल्यातील अनेकांनी ऐकलेही नसेल मात्र काळे हरभरे हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. आपल्या आहारात काळे हरभरे समाविष्ट केल्यास आपण स्वतःला अनेक रोगांपासून दूर ठेऊ शकतो. रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे हरभरे तुम्ही कच्चे किंवा उकडून खाऊ शकता. दोन्ही प्रकारच्या हरभऱ्यांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला भरपूर असे पोषक घटक मिळतात.

काळ्या हरभाऱ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. काळे हरभरे प्रोटीनने समृद्ध असतात. त्यामुळे आपल्या प्रोटिनही मिळते आणि शरीरासाठी आवश्यक असणारे घटक देखील भरपूर प्रमाणात मिळतात.

Loading...

बऱ्याच लोकांच्या शरीरात रक्ताचा इतका अभाव असतो की त्यांना अशक्तपणा सारखा आजार उध्दभवतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला रक्ताची कमतरता दूर करायची असेल तर रोज भिजलेल्या काळ्या हरभऱ्याचा तुमच्या आहारात समावेश केल्यास शरीरात आयरनचे प्रमाण वाढते आणि शरीरात रक्ताचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी देखील मदत होते.

भिजवलेल्या काळ्या हरभऱ्याचे सेवन केल्यास तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते. कारण काळ्या हरभऱ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. फायबरमुळे, आपले पोट बऱ्याच वेळ भरून राहते आणि आपल्याला सारखीच भूक लागत नाही.

भिजवलेले हरभरे हे डोळ्यांनाही फायदा देणारे आहेत. काळा हरभरा डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण करतो. डोळ्यांची निरोगी दिसण्याची क्षमता राखण्यासाठी देखील भिजवलेल्या हरभऱ्यांचे सेवन केले पाहिजे.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्यापोटी काळे हरभरे खायला पाहिजे. जर कच्चा हरभरा खायचा नसल्यास मूठभर हरभरा रात्रीच्या वेळेस पाण्यात भिजवा आणि हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी घ्या. दररोज असे केल्याने आपल्याला काही दिवसांत निश्चितच फरक दिसून येतो.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *