Breaking News
Loading...
Home / बातम्या / या भयंकर बिमारीने घेतला होता कादर खान यांचा जीव, या बिमारीतून वाचणे आहे कठीण

या भयंकर बिमारीने घेतला होता कादर खान यांचा जीव, या बिमारीतून वाचणे आहे कठीण

गेल्यावर्षी १ जानेवारी या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला होता. आपल्या अभिनयाने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे कादर खान हे नवीन वर्षालाच सर्वाना रडवून गेले होते. पण आजारच असा झाला होता ज्यातून वाचणे कठीण आहे. कादर खान यांनी काही वर्षांपूर्वी बोलणे देखील बंद केले होते.

ते इशाऱ्यातून किंवा हळू आवाजात थोडंफार बोलू शकायचे. पण नंतर त्यांचा आजार जास्त वाढला आणि ते रुग्णालयात व्हेंटिलेटरवर पोहचले होते. अखेर त्यांचा या भयंकर आजाराने बळी घेतला होता. जाणून घेऊ हि कोणती बिमारी आहे आणि याचे काय लक्षण असतात.

Loading...

कादर खान यांचे निधन प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी PSP या आजारामुळे झाले होते. हा आजार एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये रुग्णाच्या डोळ्याची नजर खाली जात नाही. जर खाली काही बघायचे असेल तर पूर्ण चेहराच खाली करावा लागतो. या आजारात रुग्ण एका जागेवर स्थिर होऊन जातो. त्याची हालचाल बंद होते व शरीराचे संतुलन देखील बिघडते.

या आजाराने पीडित व्यक्तीत बोलणे, जेवण गिळणे आणि दृष्टीपासून शरीरात अनेक मानसिक बदल होतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात देखील अनेक बदल होतात. दिल्ली येथील न्यूरोलॉजिस्ट डॉ देवशीस यांच्या मते हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या स्नायूंचे सर्व नियंत्रण संपते. यामुळे डोळ्यांचे देखील नियंत्रण जाते. माणसाला खाली वर देखील बघता येत नाही.

डॉक्टरांच्या मते या आजारात आपल्या डोळ्याचे बुबुळ सर्वात आधी हालचाल करायचं बंद करते. याच आजाराने कादर खान यांना आपल्या विळख्यात ओढलं आणि त्यांचा जीव गेला.

कादर खान यांना २००९ मधेच हा आजार झाला होता. पण हळू हळू त्यांच्यात याचे लक्षण दिसायला सुरुवात झाली. हा एक असा आजार आहे जो काळासोबत जास्त वाढत जातो. पीडित व्यक्तीची विचार करण्याची बोलण्याची क्षमता संपत जाते. संतुलन संपल्याने चालता देखील येत नाही. चालताना पडण्याचा धोका असतो. हा रुग्ण स्वतःचे कोणतेच काम स्वतः नाही करू शकत. आजार झालेला व्यक्ती जास्तीत जास्त ७-८ वर्ष जगतो.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *