Breaking News
Home / प्रेरणादायी / स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला पण शंकररावांनी जायकवाडी पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही!

स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला पण शंकररावांनी जायकवाडी पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही!

महाराष्ट्रात आज छोटी मोठी हजारो धरणं आहेत. पण या धरणामध्ये एका धरणाचं नाव प्रामुख्याने खूप प्रसिद्ध आहे. कारण हे धरण आशिया खंडातील मातीचं सर्वात मोठं धरण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठवाड्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या जायकवाडी धरणाबद्दल.

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणास नाथसागर म्हणून देखील ओळखले जाते. १९७६ मध्ये गोदावरी नदीवर हे धरण बांधण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे हे धरण वसलेले असून धरणाची पाणीसाठवणूक क्षमता १०२ TMC आहे.

जायकवाडी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे. जायकवाडी धरणामुळे मराठवाड्यातील जवळपास २.४० लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. नाथसागर पैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी गावात आहे. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण पूर्णपणे माती आणि दगडांनी बांधलेले आहे. जायकवाडी प्रकल्पाचे काम १९६५ साली सुरु झाले तर हे काम १९७६ मध्ये पूर्ण झाले. या धरणात १०० पाणीसाठा झाल्यास धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांचा २ वर्षांचा पाणीप्रश्न मिटतो.

जायकवाडी धरणाची उंची ४१.३ मीटर असून धरणाची लांबी हि ९९९७ मीटर आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामुळे लाभक्षेत्रातील भागाचा सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे धरण तयार झाले. मराठवाड्याची तहान भागवण्याचा उद्देश व उद्योग धंदे वाढीसाठी हे धरण बनवण्यात आले. जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी शंकररावांना खूप संघर्ष करावा लागला. हे धरण पूर्ण होऊ नये म्हणून त्यांचे पूर्ण विरोधक एकवटले होते. पण त्यांनी हे धरण पूर्ण करूनच दाखवके.

शंकररावांनी जीवाची पर्वा न करता पूर्ण केले धरण-

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडीच्या निर्मितीसाठी शंकररावांना मोठा संघर्ष करावा लागला. या धरणामुळे त्यांच्यावर मरण ओढवणारा प्रसंग देखील आला होता. धरणाच्या त्या काळातील विरोधकांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. चव्हाण यांनी केंद्राकडून जायकवाडी मंजूर करून आणले. पण धरणाचे विरोधक त्यांच्या जीवावर उठले.

शंकरराव शेवगावला जात असताना एका डोंगराच्या पायथ्यापासून जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या गादीवर मोठमोठे दगड गडगडत आले. ते दगड गाडीवर पडावे असा प्लॅन होता पण शंकरराव यातून वाचले.

शंकरावांची गाडी काही फूट पुढे गेल्यावर ते दगड जमिनीवर आदळले. शंकरराव हा जीवघेणा प्रसंग येऊनही डगमगले नाहीत. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर १९६५ रोजी शुभारंभ केला. धरणाचे उदघाटन १९७६ मध्ये झाले.

लाल बहादूर शास्त्री यांच्याशिवाय इंदिरा गांधी यांचे पाय देखील धरणाच्या मातीला लागलेले आहेत. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. पैठणच्या शेतकरी कुटुंबात त्यांच्या जन्म झाला होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पैठणच्या शाळेत तर हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बीए एलएलबी पूर्ण केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *