Breaking News
Loading...
Home / आरोग्य / एका इटालियन नागरीकाने सांगितलेला कोरोनाबद्दलचा हा संवाद प्रत्येकाने वाचायला हवा

एका इटालियन नागरीकाने सांगितलेला कोरोनाबद्दलचा हा संवाद प्रत्येकाने वाचायला हवा

जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. परंतु या सर्व परीस्थितीत तु्म्ही निवांत फिरताय, मित्रासोबत बार, हाॅटेल मध्ये फिरताय तर खालील संपुर्ण संवाद नक्की वाचा खालील संपुर्ण संवाद एका इटालियन नागरीकाने सांगितलेला आहे.

यावरुन आपणास कळेल आपल्यावर कसले संकट आलेले आहे. पहिले बघु ही गोष्ट कशी वाढत गेली.

Loading...

🟢स्टेज १:

आपल्याला माहीती झाली कोरोना नावाचा वायरस आला आहे. आपल्या देशात याचा पहिला रुग्ण सापडला. काही होणार नाही, ही फक्त एक छोटी बिमारी आहे. माझे वय कुठे ७५+ आहे मि एकदम टणटण आहे. मि सुरक्षीत आहे. मला काही होणार नाही, मास्क लावायची गरज नाही.

घाबरायचे कारण नाही, नेहमी प्रमाणे आपले काम सुरू ठेवावे.

🔵स्टेज २:

कोरोना बाधीत रुग्णाची संख्या वाढत आहे.

काही भागास “रेड झोण” घोषीत करण्यात आले. ज्या ठिकाणी पहिले रुग्ण सापडले त्या ठिकाणी रुग्णाची संख्या वाढत आहे. (फेब्रु २२) थोडी काळजी करणे साहाजीक आहे परंतु सरकार योग्य उपाययोजना करत आहे.

काही लोकांचा मृत्यु होतो पण ते लोक वयस्कर आहेत. मिडीया टिआरपी करीता जास्त घाबरवत आहे. लोकांचे आयुष्य सुरळीत सुरू आहे. मि माझेही आयुष्य तसेच सुरू ठेवतो. मिडीयामुळे मि माझे काम थांबिवणार नाही. मला काही होणार नाही सर्वकाही ठिक आहे.

🟣स्टेज ३

बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट झाली. मृतांची संख्या वाढत आहे. ४ भागांना रेड झोन घोषीत करण्यात आले व ज्या भागात जास्त रुग्ण आढळले त्या ठिकाणास अलिप्त ठेवतात. (मार्च ७)

२५% ईटली बंद करण्यात आली. या भागातील शाळा, विद्यापीठ बंद परंतु हाॅटेल, बार, कार्यालय आत्ताही सुरू आहे.

सरकारने दिलेला हुकूम काही वृत्तपत्रात आला. हुकूमा नंतर या भागातील १० हजार लोक रातोरात आपल्या घराकडे परतले. (हा प्रसंग महत्वाचा आहे)बाकी ७५% ईटली नेहमी प्रमाणे आपले आयुष्य जगत आहे. अजुनही बहुसंख्य लोकांना परिस्थीतीची गंभीरता कळली नाही. टिव्ही, मोबाईल सर्वत्र आजार होऊ नये म्हणुन घ्याची काळजी याची सुचना येण्यास सुरवात झाली.

परंतु लोक अद्याप या गोष्टीस सिरीयस घेत नाही आहे.

🟠स्टेज ४

रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक महिन्यापासुन शाळा व विद्यापीठ बंद आहेत. देशात आरोग्याची आणिबाणी लावण्यात आली. कोरोना पेशंट करीता दवाखान्यात जागा वाढविण्यात आली. डाॅक्टर व नर्सचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडत आहे. निवृत्त कर्मचार्यांना सेवेवर परत बोलावले व मेडिकलच्या शेवटच्या दोन वर्षातील विद्यार्थ्यांना सेवेत घेतले. डाॅक्टर व नर्स कोरोना बाधित होत आहे व त्यांचा कुटूंबाकडे आजार पसरत आहे.

न्युमोनियाचे अनेक पेशंट देखील दाखल होत आहे व आयसियुमध्ये जागेची कमतरता जाणवत आहे. युध्दाप्रमाणे परिस्थीती निर्माण झाली: जगण्याच्या चान्सेस व डाॅक्टर पेशंटची निवड करत आहे. वयस्कर व अशक्त रुग्णांना ईलाज केल्या जाणार नाही कारण कोरोना पेशंटकरीता प्राथमिकता बनविलेली आहे.

साधनांची कमतरता जाणवत आहे त्याकरीता उपलब्ध साधनाचा वाटप करुन वापर करण्यात येत आहे. आपणास हा विनोद वाटेल परंतु ही सत्यपरिस्थीती आहे. लोकांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे कारण रुग्णालयात जागा नाही.

माझा डाॅक्टर मित्र काॅल करुन रडला कारण त्याच्या समोर तिन लोक उपचाराअभावी मृत्युमुखी पडले. नर्सेस रडत आहे कारण ॲाक्सीजन देण्याएवजी त्या कुठलाही ईलाज करु शकत नाही आहे. मित्र व नातेवाईकांचा मृत्यु झाला कारण त्यांचा इलाज होऊ शकला नाही. सगळीकडे हाहाकार माजला आहे. संपुर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे. सर्वत्र कोरोनावायरस विषयीच चर्चा आहे.

🔴स्टेज ५

१० हजार मुर्ख लोक आठवले का जे रातोरात उर्वरीत ७५% ईटलीत पळाले होते. संपुर्ण देश कोरोणाबाधीत घोषीत झाला आहे (मार्च९)

प्रशासनाने कोरोणा वायरसचा प्रसार रोखणे हे ध्येय ठरवले आहे. लोक अद्याप कामाला जात आहे, खरेदी करु शकतात , औषधे घेऊ शकतात कारण अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते.

फक्त तुम्ही दुसर्या शहरात उचीत कारणाशिवाय जाऊ शकत नाही. अनेक लोक मास्क व ग्लोज घालुन फिरताना दिसत आहे व हे लोक स्वत:ला सुरक्षित समजतात व हाॅटेल, बारमध्ये मित्रासोबत खायला पियाला जात आहेत.

पुढील स्टेज

⚫️ स्टेज ६

२ दिवसानंतर संपुर्ण बंद घोषीत करण्यात येतो. हाॅटेल, दुकान,बार ई. फक्त मेडीकल व माॅल सुरू आहे. सर्टिफिकेट शिवाय तुम्ही फिरु शकत नाही.

सर्टिफिकेट हा सरकारी कागद आहे ज्यामध्ये आपले नाव, पत्ता व आपण कोणत्या कामासाठी बाहेर चालले हे लिहलेले आहे. पोलीसांचे अनेक चेक पाॅईंट सुरू आहे.

जर विनाकारण बाहेर आले तर २०६ युरो दंड आकारण्याच येत आहे. जर तुम्ही कोरोनाबाधित पेशंट लपवुन ठेवला तर १ ते १२ वर्ष नरसंहाराकरीता जेल होऊ शकते. शेवटचा विचार… ही सर्व परीस्थीती १२ मार्च पर्यत आहे. २ आठवड्यात हा रोग एवढा पसरला व स्टेज ३ पासुन फक्त ५ दिवस

चिन व कोरीया या स्टेजच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती नाही की पुढे काय संकट येणार आहे. मि हे सांगु शकते कारण मलाही २ आठवड्या आधी कल्पना नव्हती. आपल्या चुकामुळे हा जीवघेणा वायरस वाढला आहे. बाकी देशांना निवांत बघुन विश्वास बसत नाही कि हे देश किती हलक्यात या वायरसला घेत आहे.

जर आपण हे वाचत असल्यास नक्की काळजी घ्या. दुर्लक्ष करुन ही समस्या दुर जाणार नाही. अनेक बाधित लोक सामान्य लोकात त्यांच्या माहितीशिवाय फिरत आहेत. सरकारने बंदी जाहीर करुन चांगले केले आहे. यामुळेच प्रसार थांबणार आहे.

शेवटची विनंती ही आहे की, जिथे १,२ पेशंट आहे त्यांच्याकरीता तुम्ही आमच्यापेक्षा फक्त २ आठवडे मागे आहात. सर्वानी खबरदारी घ्यावी. मला काही होणार नाही हा समज डोक्यात ठेऊ नका. व महत्वाचे घरात रहा..

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *