
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यात घडत जाणाऱ्या घटना फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते. नेहा कक्करचा चाहतावर्ग पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
सोशल मीडियावर नेहा कक्कर प्रेग्नन्ट असल्याचे दिसून आले होते. नेहा कक्करचे काही दिवसांपूर्वी रोहन प्रीत सिंग यांच्याशी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी नेहा कक्करला एअरपोर्टवर तिच्या पतीसोबत पाहण्यात आले होते. यावेळी नेहाने सैल शर्ट आणि पँट घालण्यात आली होती.
यावेळी तिने घातलेल्या कपड्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असल्याचे दिसून आले आहे. ती प्रेग्नन्ट असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चालू झाली आहे. अनेक चाहत्यांनी यात नेहा कक्कर प्रेग्नन्ट आहे का असा प्रश्न पण विचारला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेहा कक्करची काळजी घेताना दिसून येत आहे. रोहन प्रीत सिंग हात धरून नेहा कक्करची काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे. तो कारमध्ये बसताना पण नेहा कक्करची काळजी घेताना दिसून येत आहे.
दोघांनी एअरपोर्टवर मिळून फोटोग्राफरला पोझ दिल्या आहेत. त्या दोघांनी पण पोझ देऊन झाल्यानंतर गाडीत बसून घरचा रस्ता पकडला. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेहा कक्कर प्रेग्नन्ट असल्याच्या कमेंट पण केल्या आहेत. नेहा कक्कर वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करताना पण दिसून आली आहे.