Breaking News
Home / नवीन खासरे / आयपीएलमध्ये विजेत्या मुंबईसह इतर ३ संघांना बक्षीस म्हणून किती कोटी रुपये मिळाले?

आयपीएलमध्ये विजेत्या मुंबईसह इतर ३ संघांना बक्षीस म्हणून किती कोटी रुपये मिळाले?

मुंबई इंडियन्सने यावर्षीचे आयपीएल चषक जिंकत पाचव्यांदा चषकावर नाव कोरलं. मुंबई इंडियन्स हे आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे विजेते ठरले आहेत. कोरोनामुळे यंदाचे आयपीएल यूएई मध्ये खेळवण्यात आले. दुबईत झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा ५ विकेट राखून धुव्वा उडवला. मुंबईने यापूर्वी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये चषक आपल्या नावावर केले होते.

मुंबईत इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात चषक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. यंदा कोरोनाचे संकट असल्याने आयपीएल होणार का नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयने हे आव्हान खूप चांगल्या पद्धतीने पेलत आयपीएल यशस्वीरित्या खेळवून दाखवले. १० वर्षात प्रथमच आयपीएल दुसऱ्या देशात खेळवण्यात आले.

दरम्यान यावर्षीच्या आयपीएलमध्ये बक्षिसाची रक्कम कमी करण्यात आली होती. IPL 2020पूर्वी बीसीसीआयनं बक्षीस रक्कम ५०% कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मागच्या आयपीएलमध्ये विजेत्या संघास २० कोटी रक्कम देण्यात आली होती तर उपविजेत्या संघास १२.५ कोटी रक्कम देण्यात आली होती. पण यंदा विजेत्या संघास १० कोटी तर उपविजेत्या संघास ६.२ कोटी रुपये देण्यात येणार होते.

या निर्णयामुळे फ्रॅन्चायजीना मोठा फटका बसणार होता. पण बीसीसीआयने हा निर्णय बदलला आहे. बीसीसीआयने हा निर्णय बदलत बक्षिसाची रक्कम पूर्ण देऊन संघाना सरप्राईस दिले आहे.

बीसीसीआयनं मागील वर्षी बक्षीस रक्कम म्हणून ३२.५ कोटी खर्च केले होते. त्यानुसार विजेत्या संघाला २० व उपविजेत्याला १२.५ कोटी दिले होते. तेवढीच रक्कम बीसीसीआयनं यंदा दिली.

यावर्षी विजेत्या मुंबई इंडियन्स संघास २० कोटी, उपविजेत्या दिल्ली संघास १२.५ कोटी, तर प्ले ऑफ मध्ये पोहचलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघास ८.७८ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघास ८.७८ कोटी रुपये मिळाले.

शिवाय फायनलमधील मॅन ऑफ दी मॅच ट्रेंट बोल्टला ५ लाख, ऑरेंज कॅप विजेत्या लोकेश राहुलला १० लाख, पर्पल कॅप विजेत्या कागिसो रबाडाला १० लाख, इमर्जिंग प्लेयर देवदत्त पडीक्कलला १० लाख, सुपर स्ट्रायकर किरॉन पोलार्डला १० लाख रुपये, Most Valuable Player जॉफ्रे आर्चरला १० लाख, गेम चेंजर लोकेश राहुलला १० लाख, पॉवर प्लेयर ट्रेंट बोल्टला १० लाख रुपये, सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ईशान किशनला १० लाख रुपये बक्षीस मिळाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *