Breaking News
Loading...
Home / आरोग्य / इंद्रायणी तांदूळ कसा ओळखावा आणि काय आहे या तांदुळाचे विशेष नक्की वाचा..

इंद्रायणी तांदूळ कसा ओळखावा आणि काय आहे या तांदुळाचे विशेष नक्की वाचा..

सुवासिक इंद्रायणी तांदूळ म्हणलं की स्वाद आणि चव जिभेवर रेंगाळते. इंद्रायणी तांदूळ बद्दल लोकांचे बरेच समज गैरसमज आज आहेत. गेल्या काही वर्षात इंद्रायणी चा वास आणि चव ही शहरातील लोकांच्या पसंतीस उतरली आहे. पण अजूनही शहरातील लोक संभ्रमात असतात की ओरिजनल इंद्रायणी कसा ओळखायचा म्हणून मुद्दाम पोस्ट करत आहे.

इंद्रायणीच्या नावाखाली अनेक प्रकारचा तांदूळ पावडर आणि पोलिश करून बाजारात खपवला जातो आणि पैसा कमावला जातोय. मुळात विषय असतो, कारण शेणखताचा जरी वापर झाला तरी रासायनिक खत वापरल्याशिवाय उत्पन्न मिळत नाही. सम्राट युरीया चा थोडा का होईना वापर करावा लागतो. सर्वात महत्वाचं म्हणजे इंद्रायणीचा सुवास येऊन चालत नाही तर मग चव ही चवदार असायला हवी.

Loading...

पीक :- इंद्रायणी भाताचं पीक हे मुळात पावसावर येणार पीक त्याला मुसळधार पाऊस लागतो आणि पोषक वातावरण लागत. अस वातावरणा फक्त बारा मावळात पाहायला मिळेल कारण बारा मावळ भाग हा सह्याद्रीच्या कुशीत आहे. याच ठिकाणी पाऊस आणि पोषक वातावरण आहे ,तांबडी माती यामुळं भाताला चव येते. म्हणजे सर्वप्रथम तांदूळ घेताना बरमावळ मधला आहे का याची खात्री करून घ्या.

भाव :- इंद्रायणी तांदळाचा भाव दरवर्षी साधारण पणे 5 रुपयांनी वाढतो कारण खत,मजुरी,बी,मशागत याचे ही भाव त्याच प्रमाणात वाढत असतात. मग शेतकरी तांदूळ विकताना काय मानसिकता असते ,की मे महिन्यापासून ते डिसेंम्बर पर्यंत हा मावळातील शेतकरी या भाताच्या पिकाकर्ता झटत असतो राबत असतो आणि वढुन ताणून खर्च करत असतो आणि तांदूळ हाताशी लागल्यावर त्याला तो विकायचा असतो. कारण याच पैश्यातून पुढचं पीक आणि कर्ज आणि संसार या सर्व गोष्टीची पूर्तता करायची असते त्यामुळं त्याला एकहाती पैसे हवे असतात त्यामुळं तो व्यापारी लोकांना कमी दरात तांदूळ द्यायला तयार होतो मग हेच व्यापारी 10 रुपये किलोला वाढवून शहरात विकतात. त्यांना दोष नाही कारण ते ही व्यवसाय करतात, परंतु शहरातील लोकांना विनंती आहे की आपण इंद्रायणी शेतकरी कडून खरेदी करा.

2020 चा भाव :- मागील वर्षी उत्तम इंद्रायणी 55 रुपये किलो प्रमाणे विकला जात होता शेतकऱ्याकडे यावर्षी प्रतिकिलो किंमत 60 रुपये असेल. (बारामावळ) बंगलोर कर्नाटक चा इंद्रयानी मार्केटला 35 रुपयांनी येतो त्यात पावडर आणि चांगला तांदूळ मिक्स करूनही विकला जाऊ शकतो त्यामुळं घेताना खात्री करून घ्यावा. पुढील आठवड्यात तांदूळ विक्रीला येईल परंतु त्याचा भाव 60 ते 65 रुपये किलो असेल ओरिजनल.

लेखन साभार
प्रशांत बाळासाहेब धुमाळ मुं पो पसुरे ता भोर जि पुणे 8380955728

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *