नवीन खासरेबातम्या

भारतीय स्टार्टअप मधील अर्थव्यवस्थेत होत आहेत ‘हे’ परिणाम

सध्याच्या घडीला स्टार्टअप आणि आयटी कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे. यामागे कोणते कारण याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनेक नवीन नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. स्टार्टअप मधून ३००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रातील एमफाईन, शिक्षण क्षेत्रातील वेदांतू, अनअकॅडमी आणि ऑटोकेअर क्षेत्रातील कार्स २४ या कंपन्यांचा समावेश आहे.

जेव्हा या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले तेव्हा त्याचे कारण १८ ऑगस्ट २०१८ या तारखेशी निगडित आहे. याच दिवशी ईकॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टला अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीने खरेदी केले होते. हा व्यवहार जवळपास १,५०,००० कोटी रुपयांना झाला होता. ही कंपनी तोट्यात असताना पण त्यांना फार मोठी किंमत मिळाली.

फ्लिपकार्ट कंपनी २०१८ या वर्षी २०६३ कोटी रुपयांनी तोट्यात होती. त्याच्या एक वर्षांपूर्वी २४५ कोटी रुपयांनी कंपनी तोट्यात आली. पण जेव्हा कंपनी विकली तेव्हा गुंतवणूकदारांचा फायदा झाला. त्यामध्ये सॉफ्ट बँकेने ९९.९५ टक्के भागभांडवल विकले. त्यामध्ये त्यांना जवळपास १०,००० कोटी रुपयांचा फायदा झाला. जेव्हा मिंत्रा आणि फ्लिपकार्ट कंपन्या विकण्यात आल्या तेव्हा त्या तोट्यातच होत्या.

बोट कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता यांनी सांगितले होते की, “मार्केटमध्ये ज्या मोठ्या गाजावाजा करत होत्या त्याच कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फंडिंग भेटली आहे. तो काळच असा होता त्यामध्ये नफा तोट्याच्या धरतीवर गुंतवणूक न करता त्या अँपवर दररोज किती ग्राहक सक्रिय आहेत यावर केली जात होती. दररोज सक्रिय ग्राहक, महिना सक्रिय असणारे ग्राहक आणि ग्राहक ते ग्राहक विक्री यावर लक्ष दिले जात होते.

या पद्धतीवरून शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार पण चक्रावून गेले होते. लोकांना जास्तीत जास्त काळ आपल्या अँप किंवा वेबसाईटवर टिकवून ठेवावे म्हणून जास्त डिस्काउंट दिला जात असायचा. जेव्हा जेव्हा डिस्काउंट बंद केला जात असायचा तेव्हा तेव्हा ग्राहक त्या ठिकाणी जायचे बंद करत असत. पेटीएमने जेव्हा कॅशबॅक देणे बंद केले तेव्हा साहजिकच त्यांचा ग्राहकवर्ग कमी झाला होता.

उद्योग क्षेत्रात ग्रेट फुल थेअरी संकल्पना सांगितली जाते. यामध्ये प्रामुख्याने वस्तू किंवा सेवेचे खरेदीमूल्य लक्षात न घेता त्याची विक्री जास्तीत जास्त प्रमाणावर कशी होईल यावर लक्ष दिले जाते. थोडक्यात १० मिलिअन डॉलर एखाद्या कंपनीचे मूल्यांकन असेल तेर ते १०० मिलिअन डॉलर पर्यंत कसे जाईल यावर विचार केला जातो.

या मधल्या काळात ज्या स्टार्टअप कडे रेव्हेन्यू मॉडेल नाही, ग्राहकवर्ग नाही त्यांना गुंतवणूकदारांकडून ६० ते ७० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या सर्व स्टार्टअपच्या वाढीला ब्रेक तेव्हा लागला जेव्हा शेअर मार्केट मध्ये एलआयसी कंपनीचा आयपीओ लाँच झाला होता. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पेटीएम कंपनीचा आयपीओ २७ टक्क्यांनी खाली आला.

त्यावेळी २१५० रुपये असणारी शेअरची किंमत सध्याच्या घडीला फक्त ६४७ रुपयांवर खाली आली आहे. प्रायव्हेट मार्केट मधील व्यवसाय जेव्हा पब्लिक मार्केट मध्ये येतात तेव्हा त्यांची कार्यपद्धती या ठिकाणी लागू होत नाही. सॉफ्ट बँक या जपानच्या कंपनीचे २०२१ – २२ मध्ये १३ बिलिअन डॉलरचे नुकसान झाले आहे.

सीबी इनसाईटने केलेल्या सर्व्हेमध्ये असे समजून आले आहे की २०२२ वर्षातील पहिल्या टप्यामध्ये ८ बिलिअन डॉलरची गुंतवणूक मिळाली असून दुसऱ्या टप्यामध्ये ३.६ बिलिअन डॉलरचीच गुंतवणूक मिळाली आहे. टायगर ग्लोबल इव्हेस्टर क्लबला १७ बिलियन डॉलरचा टेक स्टार्टअप मध्ये तोटा झाला आहे. त्यानंतर जपानच्या बँक व्हिजन फंड या कंपनीला २७.४ बिलिअन डॉलरचा तोटा झाला आहे.

सर्वसाधारणपणे अभ्यास केला तर समजून येते की भारतामधील स्टार्टअप मध्ये ८० टक्के पैसा हा अमेरिका देशातून येत असतो. त्या देशात व्याजदर वाढवल्याने ही गुंतवणूक मंदावली आहे. तेथील गुंतवणूकदार प्रामुख्याने भारतीय स्टार्टअप पासून ते इक्विटी मार्केट दोन्हीकडे गुंतवणूक करत असतात. सध्याच्या घडीला ज्या ठिकाणी गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवलेला आहे ते स्वतःचे पैसे मिळावेत म्हणून कंपन्यांकडे तगादा लावून बसले आहेत.

ओला, स्नॅपडील आणि ओयो या कंपन्या तोट्यात आहेत. ओयो कंपनीने दोन वेळा ठरवूनही आयपीओ लाँच केला नाही. स्टार्टअप फन्ड कंपनी असणाऱ्या वाय कॉम्बिनेटरने त्यांच्या पोर्टफोलिओ मधील कंपन्यांच्या संस्थापकांना दोन वर्ष कोणताही फंड न उचलता कंपनी चालवावी असे सांगितलेले आहे. ऑटोमेशन आणि वर्क फ्रॉम होम यामुळे पण बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. पुढच्या काळात युनिकॉर्न स्टार्टअप कमी झाले तरीही लोकांच्या समस्या कमी करणारे उद्योग वाढतील असा अंदाज आहे.
-विवेक पानमंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button