Breaking News
Loading...
Home / बातम्या / चीनविरोधात लढण्यासाठी भारताने रशियासोबत केली हि मोठी डील!

चीनविरोधात लढण्यासाठी भारताने रशियासोबत केली हि मोठी डील!

मागील काही दिवसांपासून भारत चीन संबंध ताणले गेले आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हा वाद अधिकच चिघळला. भारताने चीनला जशास तसे उत्तर दिले जाईल असे ठणकावून सांगितले आहे. या संघर्षानंतर भारताने चायनीज ऍप्सवर बंदी घालत चीनला इशारा देखील दिला आहे. भारताने चीनला भारतातून होणारे आर्थिक उत्पन्न कसे कमी करता येईल हे ठरवल्याचे दिसते.

दरम्यान आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सकाळी लेहमध्ये जाऊन भारतीय सैनिकांसोबत संवाद साधला. त्यांनी भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. भारताला चीनसोबतच्या वादात एका मित्रराष्ट्राची साथ मिळाली आहे. हा देश आहे रशिया.

Loading...

चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांनी एका मोठ्या संरक्षण डीलवर चर्चा केली. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 18 हजार 148 कोटी रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले.

या डीलनुसार भारत रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही एकूण 33 लढाऊ विमाने असणार असून यामध्ये 12 सुखोई-30 आणि 21 मिग-29 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे असलेल्या रशियन लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे. ही मिग 29 ची 59 विमाने आहेत.

सोबतच भारतीय हवाई दल आणि नौदलाला वापरता येतील असे 248 अतिरिक्त एअर मिसाईल देखील खरेदी करण्यात येणार आहेत. याला संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

याशिवाय फ्रान्सचे राफेल विमान देखील भारतात याच महिन्यात दाखल होणार आहेत. एकूण ६ राफेल विमान भारतात दाखल होणार आहेत . राफेल विमाने ही जगातील सर्वात घातक मिसाईलने आणि सेमी स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त आहेत. या लढाऊ विमानांमध्ये अत्याधुनिक मीटिअर मिसाईल ही हवेतून हवेत मारा करू शकणारी मिसाईल असणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *