Breaking News
Home / नवीन खासरे / जेव्हा जगातील प्रसिद्ध ब्रँड आइकिआचा सेल्स ‘या’ पद्धतीमुळे २०० टक्क्यांनी वाढला.

जेव्हा जगातील प्रसिद्ध ब्रँड आइकिआचा सेल्स ‘या’ पद्धतीमुळे २०० टक्क्यांनी वाढला.

जेव्हा घराच्या सजावटीचा विषय येतो तेव्हा प्रामुख्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि बाकी बऱ्याच गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. जेव्हा फर्निचर घ्यायचा किंवा बनवायचा विचार केला जातो तेव्हा कुठे आणि कोणते फर्निचर घ्यावे हे मात्र लवकर समजत नाही. पण आता एक असा ब्रँड भारतात आला आहे ज्याने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका झटक्यात देऊन टाकली आहेत.

जेव्हा भारतात आइकिया हा फर्निचरचा ब्रँड दाखल झाला होता तेव्हा हैद्राबाद शहरात ट्राफिक जाम झाली होती. ४५ बिलियन डॉलर्स कमवणाऱ्या आइकिया ब्रँडचे ४४५ स्टोअर्स ३० देशांमध्ये स्थापन झाले आहेत. या ब्रॅण्डची वाढ एवढी मोठी आहे की त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्या जवळपास पण नाहीत. या मागे ते मार्केटमध्ये डीकॉय इफेक्ट वापरतात हे स्पष्ट झाले आहे.

आता तुम्ही म्हणाला हा कोणता इफेक्ट? पण हा तोच इफेक्ट आहे ज्याच्यामुळे या बाजारात सध्या इकिआ हा ब्रँड टॉपला आहे. त्याच्या टॉपला असण्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत ज्यांच्याबद्दल आपण आता सांगणार आहोत. जेव्हा मार्केटमध्ये तीन प्रकारच्या वस्तू हा ब्रँड विकायला आणतो तेव्हा त्यावर डीकॉयचा नक्कीच प्रभाव असतो.

जेव्हा आपण या शॉपमध्ये जाऊन तीन वस्तू पाहतो तेव्हा प्रामुख्याने पहिली वस्तू स्वस्त असते आणि दुसरी आणि तिसऱ्या वस्तूची किंमत कमी अधिक प्रमाणात सारखीच असते. जेव्हा पहिली वस्तू ४० रुपयाला असते तेव्हा दुसरी आणि तिसरी प्रामुख्याने ६० रुपये आणि ६५ रुपयांना असते. जेव्हा ग्राहक या दुकानात जातो, तेव्हा त्याला संभ्रम निर्माण होतो.

पण शक्यतो तो घेताना ६५ रुपयांच्या वस्तूला प्राधान्य देतो कारण त्याच्या दृष्टीने ही वस्तू चांगली भेटलेली असते. याने होते असे की कंपनीची प्रिमिअम वस्तू विकली जाते आणि जी सर्वात स्वस्त आहे त्याच्यामुळे ग्राहक पण टिकून राहतो. पण परत विषय असा येतो की जगभरात असणाऱ्या एवढ्या दुकानांमध्ये या वस्तू कशा पद्धतीने विकलया जातात ?

तर यासाठी प्रामुख्याने तेथील प्रत्येक गोष्टीचा कंपनीचे अधिकारी अभ्यास करतात. त्यानुसार त्या त्या ठिकाणी ती ती मार्केटिंगची पद्धत वापरली जाते. खासकरून डीकॉयचा प्रभाव जेव्हा आपण दुकानात अवलंबतो तेव्हा सामान्यांपासून प्रिमिअम ग्राहकांचा विचार करावा. त्यामुळे आपला उद्योग वाढताना भविष्यात सामान्य ग्राहक पण प्रिमिअम होऊन जातो.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.