Breaking News
Loading...
Home / बातम्या / पैशांची बचत करता येत नसेल तर हे उपाय करुन पहा

पैशांची बचत करता येत नसेल तर हे उपाय करुन पहा

“पैशांची बचत ही सुद्धा पैशांची कमाईच असते” अशा अर्थाचे वाक्प्रचार अनेकदा आपल्या कानावर पडले असतील. आपणही पैशांची बचत करण्याचा संकल्प करतो, परंतु हे फक्त बोलण्यापुरतेच राहते. अनेक लोकांची अशी तक्रार असते की त्यांच्याकडे पैसाच टिकत नाही. पैसाच जवळ नसेल तर आपल्याला नाईक अडचणी येतात.

तुम्हालाही पैसे खर्च करण्याची वाईट सवय असेल, पण काळजी करु नका. पैसे वाचवणे ही एक कला आहे, तुम्हाला ही कला जमली तर तुम्हीही पैशांची बचत योग्य रीतीने करु शकता. आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला खिशातील पैशांची बचत करणे शक्य होणार आहे.

Loading...

१) खर्चाची यादी करा : छोट्यात छोट्या गोष्टींपासुनच्या खर्चासाठीची आर्थिक उद्दीष्टे तयार केल्यास आपण उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन साधू शकता. उदा. तुम्हाला एखादी कार विकत घ्यायची असेल, घर बांधायचे असेल, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैसे साठवायचे असतील तर अशी सर्व आर्थिक उद्दिष्टे लिहून ठेवा. आपल्यासमोर निश्चित उद्दिष्ट असेल तर आपोआपाप आपले खर्च कमी होऊन बचत करण्याची भावना वाढीस लागते.

२) क्रेडिट किंवा उधारीवरच्या खर्चावर नियंत्रण : काही लोक कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी पूर्णपणे क्रेडिट किंवा उधारीवर अवलंबून असतात, परंतु ही एक वाईट सवय आहे. आपण क्रेडिट किंवा उधारीवर तितक्याच गोष्टींची खरेदी करा, जितके आधीपासूनच आपल्या बँक खात्यावर असतील किंवा जितके आपले अपेक्षित उत्पन्न असेल. एका महिन्यात जितकी भरपाई करु शकता त्याच्या आतच खर्च करा.

३) कर्ज किंवा उसनवारी करु नका : आपल्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा उसने पैसे घेऊ नका. जरी आपण कर्ज घेतले असेल, तर लवकरात लवकर त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याकडे कुठून जादा पैसे आले तर त्यातून इतर कुठलेही मोठे खर्च करण्यापूर्वी आपण घेतलेले कर्ज किंवा उसने पैसे परत करा.

३) इमर्जन्सी सेव्हिंग करा : आपण बचत करत असलेल्या पैशांच्या आर्थिक सुरक्षेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम आपण स्वत:साठी आपत्कालीन बचत तयार केली पाहिजे. कोणत्याही वाईट परिस्थितीत ही बचत आपल्या उपयोगी येते आणि आपत्कालीन बचत जवळ असल्याने ऐनवेळी अचानक कुणाकडून कर्ज किंवा उसने मागण्याची वेळही येत नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *