Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / केवळ क्रिकेटचं नाही, तर या ७ माध्यमातूनही महेंद्रसिंग धोनी करतो रग्गड कमाई

केवळ क्रिकेटचं नाही, तर या ७ माध्यमातूनही महेंद्रसिंग धोनी करतो रग्गड कमाई

BCCI ने धोनीला त्यांच्या २०२० सालच्या वार्षिक कॉन्ट्रॅक्टमधून वगळले असले तरी त्याने धोनीच्या उत्पन्नावर काडीचाही फरक पडणार नाही, कारण केवळ क्रिकेट हे धोनीच्या उत्पन्नाचे साधन नाही. २०१८ मध्ये १०१.७७ कोटी रुपये कमाई असणाऱ्या धोनीने २०१९ मध्ये १३५.९३ कोटी रुपयांची कमाई केली होती, हे त्याचे आकडेच खूप काही सांगतात. क्रिकेट व्यतिरिक्त इतर ७ माध्यमातून धोनी कमाई करतो. चला तर पाहूया कोणते आहेत धोनीच्या उत्पन्नाचे स्रोत…

१) SEVEN : स्पोर्ट्स कपडे आणि शूज बनवणारा SEVEN हा धोनीचा ब्रँड आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये हा ब्रँड लाँच करण्यात आला होता. २) Sports Fit : २०१२ पासून महेंद्रसिंग धोनी फिटनेसच्या व्यवसायाशी जोडलेला असून SportsFit Pvt नावाच्या त्याच्या फर्मच्या भारतात २०० हुन अधिक जिम आहेत.

Loading...

३) Dhoni Entertainment : अलीकडेच लाँच झालेल्या “धोनी एंटरटेनमेंट”ने त्यांच्या व्यावसायिक वाटचालीची सुरुवात “Roar of the Lion” नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून केली, जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.

४) Mahi Racing Team India : आपल्या सर्वांना माहित आहे की धोनीला बाईक खूप आवडतात. धोनी “सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप”मध्ये एका रेसिंग टीमचा मालक आहे. या संघाची अर्धी मालकी तेलुगु चित्रपट अभिनेता, निर्माता, उद्योजक नागार्जुन यांच्याकडे आहे.

५) Chennaiyin FC : धोनीला केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर सर्व खेळांमध्ये रस आहे.फुटबॉलवर त्याचे विशेष प्रेम आहे. “इंडियन सुपर लीग” मधील “Chennaiyin FC ” या संघाचा तो मालक आहे. धोनीसोबतच विटा दानी आणि अभिनेता अभिषेक बच्चनही या संघाचे मालक आहेत.

६) Hotel Mahi Residency :महेंद्रसिंग धोनीने हॉटेल व्यवसायातही पैसे गुंतवले आहेत हे फारसे कुणाला माहित नाही. Hotel Mahi Residency धोनीच्या मालकीचे आलिशान हॉटेल त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे. ७) Branding : वरील व्यवसायांव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी आता पेप्सी, बूस्ट, कोलगेट, लिव्हफास्ट, कार्स 24 आणि गोडॅडी सारख्या बर्‍याच मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून रग्गड कमाई करतो. खेळाडूंमध्ये कमाईच्या बाबतीत धोनीचे नाव अव्वल आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *