Breaking News
Loading...
Home / बातम्या / हनी सिंगने पत्नीच्या आरोपावर सोडले मौन; म्हटला असे काही की

हनी सिंगने पत्नीच्या आरोपावर सोडले मौन; म्हटला असे काही की

बॉलिवूड आणि वाद या दोघांचे एकमेकांशी एक वेगळेच नाते आहे. बॉलिवूडमधील गायक, अभिनेते कायच चर्चेत राहण्यासाठी वाद, भांडणे आणि मारामारी याचा आधार घेत असतात. बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग पण कायमच चर्चेत राहत असतो. आता तर त्याच्यावर त्याच्या पत्नीनेच आरोप केले आहेत.

हनी सिंगवर त्याच्या बायकोनेच गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी शालिनी तलवार हिने हा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे. हनी सिंगने पण आता मौन सोडले आहे.

Loading...

हनी सिंगने सोशल मीडियावर यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, शालिनी आणि मी गेल्या 20 वर्षापासून पती पत्नी आहोत. मात्र आता शालिनीनं केलेले हे आरोप खोटे असून या आरोपांमुळे मला दुःख झालं आहे. इथून मागे मी अनेक गोष्टींचा सामना केला मात्र मी कधीही प्रेस नोट जारी केली नाही.

हनी सिंगने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सर्व आरोपांचे पण खंडन केले आहे. सोशल माध्यमात हनी सिंगने त्याचे मत मांडले आहे. हनी सिंगने पुढे म्हटले आहे की, यावेळी माझ्या आई-वडिलांवर आणि बहिणीवरही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी शांत बसून काही होणार नाही. ज्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली त्यांच्यावर आरोप केले गेले असून हे आरोप बदनाम करणारे आहेत.

या आरोपावंर उत्तर देण्यासाठी मला न्यायालयानं संधी दिली आहे. त्यामुळे न्यायालय जोपर्यंत दोन्ही बाजू एकूण निर्णय घेत नाही, तोपर्यंत कृपया कोणीही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाबवर चुकीचे आरोप करु नका. दरम्यान, मी 15 वर्षाच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. माझ्या टीमलाही माझे आणि माझ्या पत्नीचं नातं कसं आहे माहित आहे. याशिवाय माझ्या प्रत्येक मीटिंगला, कार्यक्रमाला आणि चित्रिकरणालाही माझी पत्नी माझ्या समवेतच असते.

देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल. त्यामुळे मी आता याविषयावर काही बोलणार नाहीये, असं त्याने म्हटलंय. हनी सिंगच्या या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बदनामी पण झाली आहे.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *