Breaking News
Home / बातम्या / …म्हणून सरकारी डॉक्टरवर आली कर्ज काढून रिक्षा चालवण्याची वेळ!

…म्हणून सरकारी डॉक्टरवर आली कर्ज काढून रिक्षा चालवण्याची वेळ!

कोरोना महामारीने अनेकांचं आयुष्य उध्वस्त केल्याचं आपण बघितले आहे. अनेकांना आयुष्यात नवनवीन संकटाना तोंड द्यावं लागत आहे. लॉकडाऊनमुळे भारतातीलच नाही तर जगातील आर्थिक घडी विस्कटली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण लॉकडाऊनमुळे पडला. कोरोनामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

पोट भरण्यासाठी लोक मिळेल ते काम करण्यासाठी तयार झाले आहेत. पैसे हातात आल्याशिवाय कुटुंबाचा गाडा चालवणे सामान्य नागरिकांना कठीण असते. कोरोना रुग्णांमध्ये आजही प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण अधिकच वाढत आहे.

कोरोना संकटात डॉक्टर नर्स आणि इतर कोरोना योद्धयांनी दिवसरात्र काम करून आपल्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवत आहेत. पण याच कोरोना योध्यांना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

असंच काहीसं घडलं आहे कर्नाटकातील एका डॉक्टरसोबत. कर्नाटकातील एका वरिष्ठ डॉक्टरवर चक्क रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर हि परिस्थिती ओढवली आहे सरकारी अधिकारी आणि आयएएस यांच्यामुळे. या डॉक्टरने त्यांना जबाबदार धरले आहे.

५३ वर्षीय रवींद्रनाथ हे कर्नाटकातील बेल्लारीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात २४ वर्षांपासून हे डॉक्टर कार्यरत होते. पण त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली कि त्यांना आता कर्ज काढून रिक्षा चालवावा लागत आहे. ते आता दावणगिरी शहरात रिक्षा चालवत आहेत.

रवींद्रनाथ यांनी २०१८ मध्ये एका अधिकाऱ्याच्या पोस्टिंगमध्ये मदत करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांचा छळ करण्यास सुरुवात झाली. रवींद्रनाथ हे १७ वर्ष ग्रामीण भागात देखील कार्यरत होते. त्यांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी पुरस्कारही मिळाला होता. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या एका सीईओने पदभार स्वीकारला आणि त्यांचा संघर्ष सुरु झाला.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंग मध्ये तांत्रिक समस्या दाखवून त्यांना जून २०१९ मध्ये निलंबित करण्यात आले. प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे त्यांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. पण त्यांना अजूनही पोस्टिंग मिळाली नाहीये. मागील १५ महिन्यांपासून त्यांना पगारही मिळत नसून त्यांना आता घर चालवण्यासाठी रिक्षा चालवावी लागत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *