Breaking News
Home / नवीन खासरे / गौतम बुद्धांची पौर्णिमा होते जगभरात साजरी; वाचा अधिक

गौतम बुद्धांची पौर्णिमा होते जगभरात साजरी; वाचा अधिक

सोमवार १६ मे रोजी गौतम बुद्ध यांची पौर्णिमा जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जगभर बुद्ध यांना मानणारा वर्ग आहे. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी मोठे काम केले. त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या प्रकाशाने अनेक जणांच्या अज्ञानाचा अंधार दूर केला. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म झाल्यामुळे या दिवशी पौर्णिमा हा सण असतो.

त्यांचा जन्मापासूनच प्रवास मोठा रोमांचकारी आहे. त्यांचा जन्म इसवी सण पूर्व ४६३ मध्ये कपिलवस्तू नगर येथे झाला. राजा शुक्रधनच्या घरी वैशाख पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला होता. पण त्यांचे दुर्दैव असे की त्यांच्या जन्मानंतर त्यांची आई महामाया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा संभाळ महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यांचे लहानपणापासूनच हृदय कोमल होते. त्यांना आसपासचे कोणी दुखी असलेले आवडत नसत.

पण त्यांच्या वडिलांना ते सम्राट व्हावेत अशी इच्छा होती. पण त्यांचा ओढा अध्यात्मिकतेकडे होता. यामुळे त्यांचे लग्न इ पू ५४७ मध्ये १६ व्या वर्षी यशोधराशी लग्न करण्यात आले. त्यानंतर ते वैभव संपन्न आयुष्य जगायला लागले. त्यांना राहुल हा पुत्र जन्माला आला. एकदा ते राज्यात फेरफटका मारायला गेले होते तेव्हा त्यांचे मन पूर्णतः बदलून गेले होते.

त्यानंतर त्यांनी वयाच्या २९ व्या वर्षी गृहत्याग केला. त्यानंतर संन्यास घेतल्यानंतर ते समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी एका गुरुकडे ध्यानधारणा आणि योगधारणा केली. त्यानंतर जेव्हा त्यांनी अन्नत्याग केला होते तेव्हा त्यांना शरीराचे महत्व समजले. त्यानंतर त्यांनी निरंजना नदीच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली.

ते ३५ व्या वर्षी बुद्ध झाले. त्यानंतर त्यांनी अखंड भारतभर भ्रमण केले. त्यांनी पाच शिष्यानं दीक्षा दिली होती. त्या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन म्हटले जाते. त्यांनी पाली भाषेत ज्ञान देण्यास सुरुवात केली. इ पु ४८३ मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कुशीनगर येथे त्यांनी प्राणत्याग केला. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती मिळणे आणि प्राणत्याग कर्मे सर्व वैशाख पौर्णिमेला झाले. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.