Breaking News
Home / प्रेरणादायी / कोरोना काळात मागील १५० दिवसांपासून उपाशी लोकांना जेवण देत आहे हे कुटुंब, १ किमी वरून..

कोरोना काळात मागील १५० दिवसांपासून उपाशी लोकांना जेवण देत आहे हे कुटुंब, १ किमी वरून..

देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे खासकरून गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेकांना २ वेळचं जेवण देखील मिळत नाहीये. लॉकडाऊन नंतर गरिबांना खूप संकटांचा सामना करावा लागला. पण याच लॉकडाउनच्या संकटात अनेक मदतीचे हाथ देखील समोर आले आहेत.

असाच आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील एक परिवार गरीब आणि गरजू उपाशी लोकांसाठी देवदूत बनून आला आहे. हे कुटुंब मागील १५० दिवसांपासून गरीब आणि गरजू लोकांना जेवण खाऊ घालत आहे. विशेष बाब म्हणजे हे कुटुंब काही गर्भश्रीमंत वगैरे नाहीये. स्वतः शेतीवर अवलंबून असलेलं हे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे.

स्वतः मध्यमवर्गीय असताना देखील हे कुटुंब खूप मोठे समाजकार्य करून माणुसकीचे दर्शन घडवत आहे. या कुटुंबाला हि सेवा करताना अनेक अडचणी देखील आल्या. पण त्यांनी अडचणींवर मात करत आपली सेवा सुरूच ठेवली आहे. या कुटुंबाने लॉकडाऊन लागल्यानंतर हे सामाजिक काम सुरु केले होते. ते आपल्या गावात लोकांना पोटभरून अन्न खाऊ घालत आहेत.

सुधा राणी आणि त्यांचे कुटुंब गरजूंसाठी हे जेवण बनवते. त्यांचे जेवणाचे ताट देखील हे कुटुंब स्वतः धुते. या कुटुंबाला लोकांना पिण्यासाठी पाणी आणि जेवण बनवण्यासाठी पाणी हे एक किलोमीटरवरून आणावे लागते. तरी त्यांनी याचा कसलाही त्रास न मानता हे सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे.

राणीचे पती पालुरू सिद्धार्थ हे एक सामान्य शेतकरी आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. ते मागील अनेक वर्षांपासून सामजिक कार्य करत आले आहेत. राणी यांनी त्यांच्या पतीपासूनच प्रेरणा घेतली आणि गरिबांना पोटभर अन्न खाऊ घालण्याचे ठरवले. आणि त्यांनी हे करून पण दाखवले आहे. गरिबांना सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या सामाजिक कार्यात राणी यांना त्यांचे पती, सासरा आणि इतर कुटुंबीय यांनी देखील मोलाची मदत केली आहे. त्यांच्या या कार्याला सुरु करून आता १५० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत.

राणी यांचं कुटुंबीय हे फक्त शेतीवर अवलंबून आहे. त्यांचे हे काम बघून अनेकांना देखील प्रेरणा मिळत आहे. राणीच्या पतीच्या मते त्यांच्या घरी सध्या भरपूर पाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे पत्नीला एक किमी वरून पाणी आणावं लागतं. त्यांनी जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे कि जर पाणी उपलब्ध करून दिले तर त्यांच्या या कार्यात खूप मोठा आधार होईल. या कुटुंबाकडे फक्त ३ एकर जमीन आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *