Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / महाराष्ट्रातील या ठिकाणची बिर्याणी खाल्ली नसेल तर स्वतःला बिर्याणी प्रेमी म्हणवून घेऊ नका

महाराष्ट्रातील या ठिकाणची बिर्याणी खाल्ली नसेल तर स्वतःला बिर्याणी प्रेमी म्हणवून घेऊ नका

आपली संस्कृती आणि इतिहास यासाठी परिचित असलेला खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही खूप पुढे आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उद्योग, रोजगार देणारे राज्य असल्याने संपूर्ण भारतभरातील लोक महाराष्ट्रात येतात. त्यामुळे संपूर्ण भारतातील खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात पाहायला मिळते.

खवय्यांच्या आवडीचे सर्व प्रकारचे चवदार पदार्थ महाराष्ट्रात मिळतात, मग ते शाकाहारी असोत की मांसाहारी. तसे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातील हॉटेल्समध्ये आपल्याला एक चवीचे पदार्थ मिळतील, परंतु जर तुम्हाला बिर्याणी खाण्याची इच्छा असेल तर आपण या ठिकाणी शकता. ही माहिती त्या त्या भागातील बिर्याणी लव्हर्सकडून घेतली आहे.

Loading...

१) मुंबई :

१) मुंबईमधील कॅफे नूरानी रेस्टोरंटमध्ये अनेक प्रकारच्या बिर्याणी मिळतात. इथल्या बिर्याणीची चव चांगली आहे. इथली चिकन टिक्का बिर्याणी आणि कॅरॅमल कस्टर्ड प्रसिद्ध आहे. २) मुंबई मधीलच लकी रेस्टोरंटमधील बिर्याणीही लजीज आहे. इथली चिकन आणि मटण वेजिटेबल बिर्याणी छान आहे. त्यासोबतच इथला पाया सूप आणि प्रॉन्ज बिर्याणीही मस्त आहे.

२) पुणे :

१) पुण्यातील टिळक रोडला असणारी एसपी बिर्याणी जबरदस्त आहे. मध्यंतरी इथल्या बिर्याणीत आल्या सापडल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला होत्या, परंतु ग्राहकाने जाणीवपूर्वक हॉटेलची बदनामी करण्यासाठी हे कृत्य केल्याचे हॉटेलचालकांनी दाखवून दिले. २) पुण्यातील कमिशनर ऑफिसच्या जवळ असणारी ब्लु नाईल बिर्याणी अतिशय लजीज आहे. इथली चव तुम्हाला हैद्राबादच्या बिर्याणीची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.

३) बीड :

बीडच्या कारंजा रोडला असणाऱ्या सिटी हॉटेलमधील बिर्याणी चवीला अतिशय मस्त आहे. मराठवाड्याचे लोक अभिमानाने सिटी हॉटेलच्या बिर्याणीला सजेस्ट करतात. याव्यतिरिक्त मिरज मधील रेहमतुल्ला, अहमदनगरमधील झमझम, जळगावमधील हबिबुल्ला, लातूरमधील गरम मसाला, औरंगाबादमधील करीम, नागपूरची बाबूज, सोलापूरमधील खान चाचा, अशीही काही प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल्स आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *