Breaking News
Loading...
Home / बातम्या / मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने मला पक्ष सोडायला भाग पाडले, ओबीसी नेत्याने केला गौप्यस्फोट..

मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने मला पक्ष सोडायला भाग पाडले, ओबीसी नेत्याने केला गौप्यस्फोट..

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला. मागील अनेक दिवसांपासून चालू असलेल्या चर्चाना त्यांनी पूर्णविराम देत भाजपला रामराम ठोकला आहे.

खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.

Loading...

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली होती. खडसे हे २३ तारखेला मुंबईत दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी आज फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडत असल्याचा थेट आरोप त्यांच्यावर केला. फडणवीस यांनी आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान खडसे यांच्या धक्क्यानंतर आता इतर नेतेही गौप्यस्फोट करायला लागले आहेत.

खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. मला यामुळे तिकिटही नाकारण्यात आले होते असे ते म्हणाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *