उभं राहून पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत तोटे ; तर बसून पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

पाण्याला आपण जीवन म्हणतो. आपण पाणी पिण्याचे आजपर्यंत अनेक फायदे ऐकले असतील मात्र चुकीच्या पद्धतीने जर आपण पाणी पिलो तर त्याचे आपल्याला हानिकारक परिणाम देखील भोगावे लागतात. ज्या स्थितीत एखादी व्यक्ती पाणी पिते अगदी तसंच त्याच्या आरोग्यावर चांगले आणि वाईट परिणाम होत असतात.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपण जर उभे राहून पाणी पिलो तर यापासून आपल्याला हानी होऊ शकते. उभे राहून पाणी पिण्याचे अनेक तोटे आहेत. उभे राहून पाणी पिल्यामुळे अन्न आणि विंड पाईप मध्ये होणार ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि ज्याचा परिणाम केवळ फुफुसांवरच नाही तर हृदयावर देखील होत असतो.
उभे राहून पाणी पिल्यामुळे पोटाचा खालच्या भागावर विशेष दबाव निर्माण होतो. ज्यामुळे पोटातील अवयवांचे मोठे नुकसान होते आणि या सवयीमुळे बऱ्याच लोकांना हर्नियाचा त्रास देखील सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे उभे राहून पाणी पिल्यास आपल्या शरीरातून जलद गतीने जल प्रवाह सांध्यांमध्ये जमा होतो. हाडांच्या संयुक्त भागांमध्ये द्रव नसल्यामुळे सांधे दुखी झाल्याने हाडे कमकुवत होतात.
जेव्हा एखादी व्यक्ती उभे राहून पाणी पित असते तेव्हा फिल्टर न होता खाली वेगाने पाणी पोटात सरकते ज्यामुळे पाण्यात जमा होणारी अशुद्धी किडनीत जमा होते. जे किडनीसाठी अत्यंत हानीकारक आहे.
बसून पाणी पिण्याने पाण्याचे योग्य प्रकारे पचन होते आणि शरीराच्या सर्व पेशींमध्ये पाणी पोहोचण्यास मदत होते. त्या व्यक्तीच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी पाणी मिळते आणि उर्वरित पाणी आणि विषाक्त पदार्थ शरीरातून बाहेर पडतात.
गरम पाणी पिल्याने तर वजन कमी करण्याच्या बाबतीत चांगलेच फायदे मिळतात. गरम पाणी पिल्याने अतिरिक्त चरबी होत नाही आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. बसून पाणी पिल्यामुळे हानिकारक पदार्थ रक्तामध्ये मिसळत नाहीत तर ते रक्त स्वच्छ करण्याचे काम करतात.