Breaking News
Loading...
Home / आरोग्य / एकदा कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो का ?

एकदा कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो का ?

काही दिवसांपूर्वी लॉस एंजेल्स टाईम्समध्ये एक बातमी छापून आली होती. चीनच्या इतर शहरांप्रमाणेच सुझोऊ शहरातही कोरोनाचा प्रसार झाला होता. त्या शहरातील एका कॉलनीत राहणारा वांग नावाचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले.

उपचारानंतर वांग लवकरच बराही झाला. त्यानंतर कॉलनीतील लोकांनी वांगच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित केली. परंतु पार्टीनंतर तीन दिवसांनी वांग पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. जपानमधील एका ७० वर्षीय व्यक्तीसोबतही असाच प्रकार घडला.

Loading...

भारतात देखील कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. लोक बरेही होत आहेत. ही बातमी लिहीपर्यंत भारतात ४७८९ लोक कोरोनाबाधित असून त्यातून ३५३ लोक उपचार घेऊन बरेही झाले आहेत. बरे झालेले लोक आपापल्या घराकडे आल्यानंतर काही दिवस त्यांना क्वारंटाईन केले जात आहे.

चीन आणि जपानमधील दोन घटना पाहता आपल्याही मनात शंका आली असेल की कोरोनाचा उपचार घेऊन बरे झालेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का ? चला तर मग पाहूया आपल्या मनातील या प्रश्नाचे उत्तर…

एकदा कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो का ?

या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होण्याची दोन कारणे असू शकतात. १) बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज म्हणजेच शरीरातील अशा सैनिक पेशी ज्या व्हायरस, बॅक्टेरिया किंवा शरीरातील इतर घुसखोरांविरुद्ध लढतात. अँटीबॉडीज थेट शरीराच्या प्रतिकारशक्तीशी संबंधित असतात.

२) काही वेळा व्हायरस बायफेसिक सुद्धा असू शकतो. म्हणजेच असा व्हायरस कुठलीही लक्षणे न दाखवता दीर्घकाळपर्यंत शरीरात पडून राहतो. कोरोना व्हायरसदेखील शरीरात प्रवेश केल्यापासून दोन ते तीन आठवड्यांनी आपली लक्षणे दाखवतो. शास्त्रज्ञ आणि तज्ञांनी केलेल्या नव्या चाचणीमध्ये कोरोनाचा व्हायरस आपल्या श्वासनलिकेच्या आतल्या बाजूला असल्याचे निदर्शनास आले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *