Breaking News
Loading...
Home / बातम्या / दीपिका पदुकोणच्या बॉडीगार्डचा पगार ऐकलात का? त्यांचा पगार ऐकून व्हाल थक्क

दीपिका पदुकोणच्या बॉडीगार्डचा पगार ऐकलात का? त्यांचा पगार ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे बॉडीगार्ड्स यांच्या बद्दल एक से बढकर एक नवीन कथा सांगितल्या जातात. बॉलिवूड कलाकारांचे आणि त्यांच्या बॉडीगार्ड्सचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे नाते असते. त्यांना त्या बदल्यात मोठा पगार पण मिळत असल्याचे सांगण्यात येत असते.

बॉलिवूड स्टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेराबद्दल पण अनेक गोष्टी सांगितल्या जातात. शेरा हा सलमान खान सोबत सावलीप्रमाणे वावरत असतो. दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड जलाल बद्दल पण अशाच गोष्टी सांगितल्या जातात. जलाल आणि दीपिकाचे नाते बहीण भावाप्रमाणे राहिलेले आहे.

Loading...

दीपिका सोबत जलाल खूप दिवसांपासून आहे. दोघेही कोठेही गेले तरी सोबतच असतात. दीपिका जलालला दर राखी पौर्णिमेला राखी बांधत असते. जलाल पण सावलीसारखाच दीपिका सोबत कायम असतो. दीपिका बॉडीगार्ड जलालला घरातील एक सदस्य मानते.

दीपिका एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. त्या वेळेस गर्दीला नियंत्रणात आणण्याचे काम जलाल वर असते. विशेष म्हणजे दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या लग्नात सुरक्षेची जबाबदारी जलालवर होते. ती त्याने अगदी चोख पद्धतीने बजावल्याचे दिसून आले आहे.

दीपिका जलालला वर्षाकाठी १ कोटी रुपये पगार देते. दीपिका पदुकोण आधी त्याला ८० लाख रुपये पगार देत होती. पण मध्यंतरी त्याचा पगार वाढवल्याचे दिसून आले आहे. दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी सध्याच्या घडीला जलाल वरच असून तो ती सुरक्षेची योग्य पडत आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *