Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / १२५ प्रकारच्या देशी वाणांची “बियाणे बँक” स्थापन करणारा अवलिया शेतकरी

१२५ प्रकारच्या देशी वाणांची “बियाणे बँक” स्थापन करणारा अवलिया शेतकरी

ऍग्रीकल्चर हा एकमेव असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये कल्चर हा शब्द जोडून येतो. अध्यात्माच्या भाषेत सांगायचे झाले तर मनुष्य आणि त्याच्या भोवतीचे विश्व मिळून जो निसर्ग बनतो, त्या निसर्गावर काही संस्कार करुन मनुष्य आपली जीवनयात्रा चालवित असतो. शेती हा मानवाच्या जगण्याचा, पोषणाचा आधार आहे. निसर्गतः मिळणाऱ्या जमीन, जल, बियाणे यांची नियोजनबद्धरीत्या सांगड घातल्यानेच शेतीचा जन्म झाला. म्हणूनच शेतीकडे केवळ एक व्यवसाय म्हणून नाही, तर एक संस्कृती म्हणून बघितले जाते.

आधुनिक काळात शहरीकरण, जमिनीच्या वाटण्या, इत्यादि कारणांमुळे शेतीचे क्षेत्र कमी व्हायला लागले आहे. त्यामुळे शेतकरीही कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन देणाऱ्या हायब्रीड म्हणजेच संकरित पिकांकडे वळू लागले आहेत.

Loading...

हायब्रीड प्रकारच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात आणि कमी काळात जास्तीचे उत्पादन मिळायला लागले. हळूहळू देशी वाणांची जागा हायब्रीडने घेतली. आज हायब्रीडचा इतका अतिरेक झाला आहे की लोकांच्या रोजच्या खाण्यापिण्यात देखील हायब्रीडशिवाय भेटत नाही.

“खाणंच हायब्रीड झालंय, त्यामुळे लोकांची शारीरिक ताकत कमी व्हायला लागली आहे” असा तक्रारीचा सूरही अधूनमधून आपल्या कानावर पडतो. लोकांना देशी वाणांविषयी आजही प्रचंड आकर्षण आहे. खपली गहू, कशी भोपळा, दगडी ज्वारी, घुंगरु शेंगदाणा, देशी तूर, ६० दिवसात पिकणारा तांदूळ असे शब्द आपण ऐकले असतील.

असे देशी वाण आजकाल सहसा भेटत नाहीत. पण सोलापूर जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने मात्र जवळपास १२५ देशी वाणांची “बियाणे बँक” स्थापन करुन काळाच्या ओघात लुप्त होत निघालेल्या बियाण्यांच्या देशी वाणांच्या संवर्धनाचे कामच हाती घेतले आहे.

अनिल गवळी असे त्या अवलिया शेतकऱ्याचे नाव असून सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पोखरपूर गावामध्ये घरच्या १५ एकर पैकी ६ एकर शेतीच्या माध्यमातून ते जवळपास १२५ देशी वनांचे जतन करत आहेत. २०११ पासून ते अविरतपणे हे काम करत आहेत. त्यांच्याकडे भाजीपाल्याचे १५, कडधान्याचे २०, तृणधान्याचे २०, फळभाज्या आणि वेलवर्गीय भाज्यांचे ६० व इतर १० देशी बियाण्यांच्या वाणांचा संग्रह आहे. गेल्या ९ वर्षांत महाराष्ट्रभर फिरुन त्यांनी हे वाण जमा केले आहेत.
(संपर्क : अनिल गवळी – ९७६७७६७४९९)

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *